गोलेगाव प्रतिनिधी : चेतन पडवळ.
ता.७ शिरूर शहरातील स्टेट बँक कॉलनी येथे 70 वर्षीय वृद्धच्या गळ्याला तलवार लावून तिच्या गळ्यातील पोत हिसकावून जबरी चोरी करणाऱ्या आरोपीला शिरूर पोलीस स्टेशनच्या पथकाने जेरबंद केले असल्याची माहिती शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली असून आरोपीने हा गुन्हा दोन अल्पवयीन मुलांच्या साथीने केल्याची कबुली दिली आहे.
शिरूर पोलिसांच्या या कारवाईचे शिरूर शहर व तालुक्यातून कौतुक होत आहे. नागेश अशोक अल्ले (रा. गोलेगाव रोड, वात्सल्य हॉस्पिटल शेजारी ता शिरूर जि पुणे ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत रेखा शिवाजी वाखारे यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती. दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी सव्वा सात वाजता फिर्यादी यांच्या सासूबाई हिराबाई वाखारे या घरातील हॉलमध्ये बसले असताना अचानक घरामध्ये तीन तरुणांनी प्रवेश करून वृद्ध हिराबाई यांच्या गळ्याला तलवार लावून त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून येण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शिरूर पोलीस स्टेशन जवळच असणाऱ्या स्टेट बँक कॉलनी येथे अशाप्रकारे वृद्ध महिले बाबत घरात घुसून जबरी चोरी झाल्याने याबाबत नागरिकांमध्ये व महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या प्रकाराची गंभीर दखल घेत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी या गुन्ह्याचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण व स्थानिक शोध पथकाला गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश दिले होते.
पोलीस पथकाने सदर भागामध्ये असणारे सीसीटीव्ही कॅमेरे व तांत्रिक माहितीच्या आधारे यांची पाहणी करून आरोपी शोधण्याचे काम तपास पथकाने सुरू केले असता तपास पथकाला या गुन्ह्यातील आरोपी गोलेगाव रस्त्यावर येणार असल्याचे समजल्याने पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार नाथा जगताप,पोलीस अमंलदार नितेश थोरात, सचिन भोई, विजय शिंदे, निरज पिसाळ, निखील रावडे, रघुनाथ हळनोर, अजय पाटील या तपास पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून आरोपी नागेश अल्ले याला ताब्यात घेऊन अटक केली. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, हा गुन्हा त्याने दोन अल्पवयीन मुलांच्या साथीने केला असल्याचे सांगितले आहे. पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण करीत आहे.
सदरची कार्यवाही पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक पंकज देशमुख , पुणे अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले , निरीक्षक संदेश केंजळे साो यांचे मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे पोसई शुभम चव्हाण, पो हवा नाथसाहेब जगताप, पोलीस अमंलदार नितेश थोरात, सचिन भोई, विजय शिंदे, निरज पिसाळ, निखील रावडे, रघुनाथ हळनोर, अजय पाटील यांचे पोलीस पथकाने केली आहे