प्रतिनिधी : जिजाबाई थिटे
श्री भैरवनाथ विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय पाबळ येथील मराठी विषयाचे शिक्षक प्रा.संतोष क्षीरसागर यांनी सकाळ माध्यम समूहाच्या एनआयई व एम टेक इंजिनियरींग पुणे यांच्यातर्फे ‘असा साधला संवाद’या राज्यस्तरीय लेखन स्पर्धेत उच्च माध्यमिक गटात प्रथम क्रमांक मिळवला.पिंपरी चिंचवड मधील ज्ञानप्रबोधनी नवनगर विद्यालयातील मनोहर वाढोकर सभागृहात हा सन्मान सोहळा संपन्न झाला.या सन्मान सोहळ्यासाठी पुणे पिंपरी चिंचवडसह सातारा,अहिल्यानगर,बारामती,नागपूर,अमरावती,बुलढाणा,सोलापूर, पंढरपूर,पालघर,नवी मुंबई, सांगली,इचलकरंजी,कोल्हापूर,नाशिक, जळगाव,धुळे,नंदुरबार, ठाणे,छत्रपती संभाजीनगर यांसह महाराष्ट्रातील विजेत्या शिक्षकांना स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले.एम टेक इंजिनियरचे सरव्यवस्थापक नदीम शेख,पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन अधिकारी संगीता बांगर/ घोडेकर,सकाळच्या पिंपरी चिंचवड आवृत्तीचे सहयोगी संपादक जयंत जाधव,ज्ञानप्रबोधनी नवनगर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विद्या उदास,परीक्षक प्रा.शिवराज पिपुंडे,वरिष्ठ बातमीदार पितांबर लोहार,यांच्या हस्ते हे पारितोषिक वितरण करण्यात आले.प्रा.संतोष क्षीरसागर हे भैरवनाथ विद्यामंदिर येथे मराठी
विषयाचे शिक्षक असून ते शिरूर तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे सरचिटणीस आहेत.विद्यालयाचे प्राचार्य अविनाश क्षीरसागर,उपप्राचार्य सुदाम पिंगळे,पर्यवेक्षक तुकाराम ताम्हाणे,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे ग्रामीणचे उपाध्यक्ष प्रा जितेंद्रकुमार थिटे,एकनाथराव बगाटे,निळकंठ पाटील,कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे संदीप गवारी,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे ग्रामीणचे शिरूर तालुका उपाध्यक्ष मच्छिंद्र खेडकर,भैरवनाथ सेवक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष कुमारआबा चौधरी,शिरूर तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या अध्यक्षा प्रा.निर्मला संकपाळ,भैरवनाथ सेवक सहकारी पतसंस्थेचे सचिव राहुल गायकवाड यांनी अभिनंदन केले.