गोलेगाव प्रतिनिधी
गोलेगाव ता.९ शिरूर शहरा जवळील पुणे नगर बाह्यमार्गावर(बायपास) सुनील वडेवाले टपरी जवळ कमरेला गावठी पिस्तूल लावून उभा असलेल्या तरुणाला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे विभागाच्या पथकाने सापळा रचून पकडले असून,त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतूस असा ४१ हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी निखिल सतीश थेऊरकर (वय २१ रा.कर्ड ता. शिरुर जि. पुणे) याला अटक केली आहे. याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे दिनांक आठ जानेवारी रोजी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत असताना त्यांना गोपनीय बातमी दाराकडून माहिती मिळाली होती की शिरूर जवळ पुणे नगर बाह्य मार्गावर सुनील वडेवाले टपरी जवळ एक तरुण कमरेला पिस्तूल लावून उभा आहे. याची गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन पंचासह शिरूर जवळ पुणे अहिल्यानगर बाह्य महामार्गावर असणाऱ्या सुनील वडे वाले यांच्या टपरीजवळ सापळा रचून बातमी मिळालेल्या वर्णनानुसार असणाऱ्या तरुणाला पकडले त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याजवळ एक गावठी पिस्तूल व मॅक्झिन मध्ये दोन जिवंत काडतूस असा एकूण ४१ हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला शिरूर पोलीस यांच्या ताब्यात दिले आहे. त्याच्यावर आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याने हे गावठी पिस्तुकाच्यासाठी आणले आहे याचा तपास सुरू आहे.ही कार्यवाही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख पुणे विभाग अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे शिरूर उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरुर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजय जाधव, राजू मोमीन, मंगेश थिगळे यांनी केली असून पुढील तपास शिरुर पोलीस स्टेशन करत आहे.