शुभम वाकचौरे
शिरूरचे भूमिपुत्र व सामाजिक न्याय विभाग, मंत्रालयाचे कार्यसन अधिकारी मा. प्रवीणजी शिशुपाल साहेब यांचा चिरंजीव आदित्य दादा शिशुपाल यांचा वाढदिवस अनाथ मुलांसोबत साजरा करून एक सामाजिक प्रेरणा निर्माण करण्यात आली. हा विशेष कार्यक्रम शिरूर येथील बोऱ्हाडे मळा, द मदर ग्लोबल फाउंडेशनमध्ये संपन्न झाला.आजच्या काळात फाईव्ह स्टार हॉटेलांमध्ये भव्य वाढदिवस साजरा करणे आणि सोशल मीडियावर हायफाय जीवनशैली दाखवण्याचा ट्रेंड असताना, शिशुपाल कुटुंबाने अनाथ मुलांसोबत साधेपणाने वाढदिवस साजरा करत एक वेगळा आदर्श घालून दिला.यावेळी आदित्य दादाच्या वाढदिवसानिमित्त मुलांसाठी गहू, तांदूळ, फळे आणि इतर उपयुक्त वस्तू भेट देण्यात आल्या. विशेष म्हणजे, अनाथाश्रमातील निल सपकाळ या लहान मुलाचा देखील वाढदिवस असल्याने त्याला नवीन पोशाख देऊन आनंद द्विगुणित करण्यात आला. दोघांनी मिळून केक कापला आणि उपस्थितांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले.द मदर ग्लोबल फाउंडेशनच्या वतीने मा. प्रवीणजी शिशुपाल व सौ. मधू शिशुपाल यांचा पुष्पगुच्छ व आभार पत्र देऊन सन्मान करण्यात आला.तसेच शिशुपाल साहेबांनी फुले, शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करणाऱ्या भारत मुक्ती मोर्चा या राष्ट्रीय संघटनेला ११००० /- रूपये जनआंदोलन निधी सुपूर्द करून पे बॅक टू सोसायटी ही महत्वपूर्ण जबाबदारी ही पार पाडली.भारत मुक्ती मोर्चा शिरूर यूनिट ने ही शिशुपाल साहेबांचे आभार मानले. कार्यक्रमास शिशुपाल कुटुंबीयांसह मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. यामध्ये शिशुपाल साहेबांचे वडील मा. विलास शिशुपाल, निवृत्त पोलीस निरीक्षक बाबासाहेब साबळे दौंड, तसेच बहुजन मुक्ती पार्टीचे राज्य महासचिव फिरोज भाई सय्यद, औरंगाबादचे प्रसिद्ध उद्योजक महादेवजी साबळे आणि जांबूत शरदवाडीचे युवा नेते सतेश सरोदे यांचा समावेश होता.या प्रेरणादायी उपक्रमामुळे सामाजिक संवेदनशीलता वाढीस लागेल आणि समाजात एक नवा संदेश पोहोचेल.