जुन्नर प्रतिनिधी
महाराष्ट्रातील शेतकरी अनेक अडचणींमुळे मेटाकोटीला आलेला असताना सरकारची ना करते पणाची भूमिका ही त्याच्या उज्वल आयुष्यासाठी त्रासदायक ठरत आहे. विधानसभा निकालानंतर काही दिवसातच दुधाचे बाजार दोन रुपयांनी कोसळले होते त्यातच सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली असल्यामुळे शेतकऱ्यांना खादटीचा प्रश्न भेडसावत आहे. सध्या महाराष्ट्रात ऊस तोडणी हंगाम चालू असल्यामुळे शेतकऱ्याला वाढे देखील भरमसाठ किमतीने विकत घेऊन दूध देणारी जनावरे जनवरी जोपासताना विकतच्या चाऱ्यामुळे शेतकऱ्याची दमछाक होत आहे त्यातच सध्याचे बाजार भाव पाहिले तर या बाजारभावामध्ये शेतकऱ्याचे भांडवली खर्च सुद्धा निघत नसल्याने काही शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीच्या दूध देणाऱ्या गाई मातीमोल किमतीत विकल्या आहे. सध्याचे महाराष्ट्रातील नवीन मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्यापासून सरकारने शेतकऱ्यांना निवडणुकी पूर्वी दिलेल्या शब्दाची जणू काही विसरत पडल्याची चर्चा महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांमध्ये चालू आहे अशातच दुग्धविकास खाते हे नामदार अतुल सावे यांच्याकडे आले असून शेतकऱ्यांच्या दुध दरवाढीसाठी त्यांनी प्रयत्न करावे या मागणीसाठी जुन्नर तालुका शेतकरी संघटनेचे युवा अध्यक्ष सचिन थोरवे यांनी मुंबई येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनाद्वारे गाईच्या दुधाला चाळीस रुपये आणि म्हैसीच्या दुधाला 70 रुपये बाजार मिळावा ही मागणी थोरवे यांनी मंत्री महोदयांकडे केली आहे. लवकरच मंत्री महोदय यावर सकारात्मक विचार करून शेतकऱ्यांना न्याय देतील अशी अपेक्षा तरी सध्या शेतकऱ्यांमध्ये आहे दुधाचे दर वाढ न झाल्यास शेतकरी त्या ठिकाणी दूध देणारी जनावरे विकून टाकण्याची दाट शक्यता वाटत आहे व त्यामुळे त्याच्यावर उपासमारीची देखील वेळ येऊ शकते असे देखील निवेदनात थोरवे यांनी म्हटले आहे. मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी यावर योग्य तो निर्णय घेऊन शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी जुन्नर तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.