गोलेगाव प्रतिनिधीं : चेतन पडवळ
.. गोलेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील माजी विद्यार्थ्यी महाराष्ट्र शासन सर्व्हेअर भूमिअभिलेख अधिकारी अभिषेक भोगावडे याचा सन्मान करण्यात आला.
गोलेगाव : ता.२८ गोलेगाव परिसरात उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.प्रथम शिवाजी विद्यालय येथील संस्थेचे सचिव संजय वाखारे संचालक रामचंद्र वाखारे शहिद स्मारक माजी सैनिक सुरेश पडवळ आरोग्य उपकेंद्र माजी सैनिक विष्णु पडवळ ग्रामपंचायत कार्यालय सरपंच दिपाली पडवळ व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मच्छिॅद्र कारंडे या मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले गोलेगाव येथील भूमिपुत्र तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे माजी विद्यार्थी अभिषेक भोगावङे यांची महाराष्ट्र शासन सर्व्हेअर भूमिअभिलेख या पदावर व दिग्विजय वाखारे यांची भारत सरकार असिस्टंट कंमाडर वर्ग १ भारतीय तटरक्षक दल पदावर नुकतीच निवड झाली.
गोलेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने राबविण्यात आलेल्या “आमची शाळा आमचा अभिमान” या उपक्रमांतर्गत या दोन माजी विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला.तसेच यावेळी शिवाजी विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विजेते स्पर्धक गुणवंत विद्यार्थ्यां यांचाही सत्कार करण्यात आला. प्रभातफेरी.लेझीम.कवायत.सांस्कृतिक कार्यक्रम व भाषणे विद्यार्थ्यांची झाली.
यावेळी सरपंच दिपाली पडवळ.उपसरपंच निलेश बांदल माजी सरपंच दिलीप पडवळ. रामचंद्र वाखारे.माजी सैनिक सुरेश पडवळ.माजी पोलीस निरीक्षक नारायण वाखारे.संतोष वर्पे.तुषार पडवळ.विश्वनाथ बांदल.जे.के.कटके.खंडु बोराडे आजी माजी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संदिप आढाव यांनी तर सूत्रसंचालन मिनाक्षी धामणे मच्छिॅद्र गायकवाड आभार शरद झेंडे यांनी आभार मानले.शशिकांत गायकवाड यांच्या वतीने विद्यार्थ्यांना भोजन देण्यात आले.