प्रतिनिधी : जिजाबाई थिटे
श्री भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आलेगाव पागा ता. शिरूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती विद्यार्थ्यांनी सावित्रीच्या वेशभूषत भाषणे व नाटीका सादर करुन स्वातंत्र्यपूर्व काळातील आठवणी जागा केल्या श्री भैरवनाथ विद्यालयामध्ये संस्थेचे अध्यक्ष आप्पासाहेब बेनके यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे शिरूर तालुका मुख्याध्यापक संघ अध्यक्ष प्राचार्य तुकाराम बेनके,उपप्राचार्य संभाजी कुटे,सुप्रिया काळभोर,प्राजक्ता शितोळे,ज्योती गजरे यांनी केले.
सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त श्री भैरवनाथ विद्यालयामध्ये ज्युनियर विभागातील मुलींनी वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये येऊन आगळीवेगळी जयंती साजरी केली.इ.७वी मधील वैष्णवी रासकर व गौरी जैन यांनी सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांची वेशभुषा केली.तन्वी टूले-सावित्रीबाई फुले,सानिका सात्रस-राष्ट्रमाता जिजाऊ,नियती वाकचौरे-अहिल्याबाई होळकर,समीक्षा भालेराव-रमाबाई,शुभांगी तोंडे-बानुबाई,निलोफर शेख-बेगम हजरत,आदिशा वाकचौरे-शेतकरी स्त्री,गायत्री शितोळे,श्रेया वाकचौरे, सानिका वाकचौरे-दक्षिणात्य पद्धत व अश्विनी वाकचौरे,कोमल जाधव यांनी महाराष्ट्रीय पद्धतीने वेशभुषा करून जयंती साजरी केली.जयंतीनिमित्त श्रावणी रणदिवे रेश्मा भोसले,आयेशा गुंजाळ रुद्र भोसले यांनी सावित्रीबाईच्या जीवनावर नाटिका सादर करून भाषणे केली.संतोष शेळके,अंबादास गावडे,दिलीप वाळके,शरद शेलार,मच्छिंद्र बेनके, बाबुराव मगर,देविदास कंठाळे ,सतीश अवचिते,सिद्धार्थ गायकवाड तसेच वैभव लाड यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याबद्दल विचार व्यक्त केले. प्राचार्य तुकाराम बेनके यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या वेशभूषेतून केलेल्या नाटिकेचे कौतुक करुन जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष हिंगे यांनी तर आभार नितीन गरुड यांनी मानले.