टाकळी हाजी (प्रतिनिधी)
पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्राथमिक,माध्यमिक व पंचायत समिती शिक्षण विभाग शिरूर यांच्या संयुक्त विद्यमाने ५२ वे शिरूर तालुकास्तरीय विज्ञान, गणित व पर्यावरण प्रदर्शन शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे चांदमल ताराचंद बोरा कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शिरूर येथे पार पडले.
२७ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२४ या कालावधीत पार पडलेल्या तालुकास्तरीय विज्ञान,गणित व पर्यावरण प्रदर्शनामध्ये जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा सविंदणे येथील शिष्यवृत्ती तज्ञ,शैक्षणिक क्षेत्रातील अनेक पुरस्काराने सन्मानित असलेले आदर्श शिक्षक दत्तात्रय अनंतराव चिकटे यांनी सहाय्यक गटात वैज्ञानिक प्रतिकृती केल्याबद्दल प्रथम क्रमांक पटकाविला आहे.ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.अनिल लचके, प्राचार्य डॉ.के. सी. मोहिते सर, शिरुर गटशिक्षणाधिकारी मा. कळमकर साहेब,विस्तार अधिकारी मा.किसन खोडदे साहेब यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.
त्यांच्या या यशाबद्दल तालुक्यातील शिक्षक संघटनेकडून व शिक्षकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे,राज्याचे मा.सहकारमंत्री ना.दिलीपरावजी वळसे पाटील,मा.आमदार पोपटराव गावडे,जिल्हा परिषद मा.सदस्य सुनिताताई गावडे,राष्ट्रवादीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गावडे,मा.पंचायत समिती सदस्य अरूणाताई घोडे, मा.पंचायत समिती सदस्य डॉ.सुभाष पोकळे,राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा शुभांगीताई पडवळ, मा.सरपंच दामूशेठ घोडे, मा.उपसरपंच गोविंद गावडे, उपसरपंच मोहन चोरे,सोसायटीचे अध्यक्ष बन्सीशेठ घोडे,चेअरमन अरुणकुमार मोटे,उपाध्यक्ष साहेबराव लोखंडे,पतसंस्थेचे व्हाइस चेअरमन खंडू जाधव,पत्रकार संघाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष विजय थोरात यांनी अभिनंदन केले.