प्रतिनिधी:जिजाबाई थिटे
-
- स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्यु. कॉलेज केंदूरचे मानांकनमध्ये आणखी एक मानाचा तुरा
- महाराष्ट्र शासन विभागाच्या उपक्रमाअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा , सुंदर शाळा संपूर्ण महाराष्ट्रातील शाळा गुणात्मक आणि भौतिक दृष्ट्या किती परिपूर्ण आहे याचे मूल्यांकन करण्यात आले. त्यानुसार तालुका,जिल्हा आणि राज्य स्तरावर शाळा निवडून त्याचे अनुक्रमे प्रथम,द्वितीय आणि तृतीय क्रमांक काढण्यात आले. यामध्ये आपल्या सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्यु. कॉलेज केंदूर ज्ञानमंदिराला शिरूर तालुका स्तरावर द्वितीय क्रमांक मिळून रूपये दोन लाखाचे बक्षीसासाठी आपली शाळा पात्र झाली. त्या निमित्ताने ग्रामपंचायत केंदूर आणि समस्त ग्रामस्थ केंदूरच्या वतीने विद्यालयाचे प्राचार्य सर्व शिक्षक, शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला त्याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना गावाने केलेला सन्मान हा हृदयस्पर्शी सर्वात मोठा सन्मान की ज्याची तुलना आकाशाच्या उंची पेक्षा जास्त वाटते तसेच या गावच्या सन्मानामुळे आम्हा शिक्षकांना आमचे काम करण्यात दहा हत्तीचे बळ मिळत राहील असे गौरवउद्गगार आपल्या गावा बद्दल काढून सर्वांना भावनिक केले.त्याबद्दल ग्रामपंचायत केंदूरचे सरपंच,उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच समस्त ग्रामस्थ केंदूरचे वतीने शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षिका,
- शिक्षकेतर कर्मचारी यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.याप्रसंगी केंदूर ग्रामपंचायतचे सरपंच उद्योजक श्री.प्रमोद पऱ्हाड यांनी शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांचे कौतुक आणि अभिनंदन केले.आपली सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्यु. कॉलेज केंदूरची शाळा पुणे,मुंबई शहरात भौतिक सुविधा नसतील अशी भव्य,दिव्य आणि गुणात्मक,भौतिक दृष्ट्या परिपूर्ण झालेली आहे त्याबद्दल आम्हाला याचा सार्थ अभिमान वाटतो गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वात जास्त प्राध्यान्य शिक्षणाकडे दिले जाईल आणि विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्या परिपूर्ण गुणात्मक शिक्षण , शाळेसाठी आणि संस्थेसाठी आम्ही पाहिजे ते सहकार्य यापुढे ही करत राहणार असे गौरवउद्गगार काढले.प्रसंगी विद्यालयातील अपूर्ण असणारी स्वच्छतागृह आणि प्रसाधनगृह सुविधासाठी गावातील सर्व लोक एकत्र येऊन लोकवर्गणी मधून येणाऱ्या काळात सुसज्ज स्वच्छतागगृह आणि प्रसाधनगगृह देण्याचे अभिवचन सरपंच उद्योजक प्रमोद पऱ्हाड यांनी आपल्या मनोगातातून गावचे वतीने दिले.प्रसंगी ग्रामनगरीच्या उपसरपंच सौ शालनताई भोसुरे, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर चे पुणे विभागीय सदस्य राम साकोरे,मा.सरपंच सूर्यकांत थिटे,मा सरपंच अमोल थिटे,विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन अभिजित साकोरे,मा. उपसरपंच भरत साकोरे,मा. सरपंच सुनिल थिटे,मा उपसरपंच भाऊसाहेब थिटे,मा. उपसरपंच मंगेश भालेकर,सामाजिक कार्यकर्ते उमेश साकोरे,शाळा व्यवस्थापन समितीचे तज्ञ संचालक पत्रकार श्रीहरी पऱ्हाड,सामाजिक कार्यकर्ते .ज्ञानेश्वर थिटे,उद्योजक बन्सी पऱ्हाड,सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब साकोरे तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन रामशेठ साकोरे तर आभार मा.उपसरपंच भरत साकोरे यांनी मानले.