शुभम वाकचौरे
शिरूर येथे पास्टर संतोष खोतकर व पास्टर शिला खोतकर संचलित बिलिव्हर्स फेलोशिप चर्च या चर्चमध्ये येशू जन्मोत्सव 2024 निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अहिल्यानगर येथील बिलिव्हर्स फेलोशिप संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पास्टर ताराचंद चक्रनारायण यांनी पवित्र शास्त्रातून वचन सांगून सर्वांना आशीर्वादित केले.
यावेळी सर्व मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले व पास्टर फेलोशिप शिरूर च्या वतीने पास्टर संतोष खोतकर व पास्टर शीला खोतकर यांचा पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला .
या कार्यक्रमाला प्रामुख्याने सिस्टर मनीषा चक्रनारायण, सकल ख्रिस्ती समाज शिरूर तालुका अध्यक्ष युवराज सोनार , पा अनिल वाघमारे , पा.महेश शिंदे, पा.प्रशांत घोडे,पा.चंद्रदीप गायकवाड , पा.विनोद वाघमारे , पा.फ्रान्सिस महांकाळे ,पा.तुषार कांबळे, ब्र.सुभाष रणसिंग ,ब्र.अजिंक्य सूर्यवंशी,ब्र विशाल जोगदंड ,ब्र.संकेत पाडळे,ब्र.सनी भिंगारदिवे,ब्र. हर्षल सूर्यवंशी ,ब्र.संदेश नवगिरे,ब्र. आशिष माळी ,ब्र.कैलास खुडे ,ब्र.क्षितिज बोरगे,ब्र. साहिल साळवे ,ब्र.संजय जाधव ब्र.संदीप जाधव ,सिस्टर राणी नवगिरे ब्र.प्रवीण शिंदे, ब्र अविनाश कांबळे , ब्र. अनिकेत खोतकर. आदी मान्यवर व इतर समाज बहुसंख्येने उपस्थित होता.कार्यक्रमाचे आयोजन बिलिव्हर्स फेलोशिप चर्च शिरूर चे सर्व लीडर्स आणि तरुण मंडळ यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिस्टर रेश्मा रणसींग यांनी केले.आणि उपस्थितांचे आभार पास्टर संतोष खोतकर यांनी मानले.