प्रतिनिधी : जिजाबाई थिटे
शिरुर तालुकास्तरीय विज्ञान गणित प्रदर्शन चांदमल ताराचंद बोरा या महाविद्यालयामध्ये दि.२७ व २८ डिसेंबर रोजी डॉ.पंडित विद्यासागर मा.कुलगुरू नांदेड,शिरुर हवेलीचे आमदार माऊली आबा कटके, शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर,प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे,गटशिक्षणाधिकारी बाळकृषण कळमकर,प्राचार्य नंदकुमार निकम,प्राचार्य के.सी.मोहिते,धरमचंद फुलफगर, प्रदर्शन समन्वयक दत्तात्रय बोबडे,शिरुर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तुकाराम बेनके,सचिव मारुती कदम,कार्याध्यक्ष रामदास थिटे विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष संभाजी ठुबे,कल्याण कडेकर आणि विज्ञान अध्यापक मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्याने हे प्रदर्शन शिरुर येथे संपन्न होत आहे. शिरुर तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळांनी या प्रदर्शनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना प्रदर्शन पाहण्यासाठी शाळांनी घेऊन यावे असे आवाहन समन्वयक डॉ. दत्तात्रय बोबडे यांनी केले.