शुभम वाकचौरे
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासन आणि ग्राहक पंचायत संस्था पुणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि. २३) तहसील कार्यालय आवार शिरूर येथे “राष्ट्रीय ग्राहक दिन” सप्ताहाची उत्साहात सांगता झाली.
राष्ट्रीय ग्राहक दिन सप्ताहातील मागील सात दिवसांच्या कार्यक्रमांचा आढावा घेवून ग्राहकांचे हक्क व अधिकार याची माहिती देत विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना समजेल अशा सोप्या भाषेत उदाहरणासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी ग्राहक प्रबोधन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी संस्थेच्या कामाविषयी कौतुक केले. उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रत्येक नागरिक हा ग्राहक असतो, ग्राहकांची फसवणूक किंवा अडवणूक होत असेल तर ग्राहक पंचायत हा उत्तम पर्याय उपलब्ध असून नागरिकांना न्याय देण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी तहसिलदार बाळासाहेब म्हस्के, नायब तहसीलदार एस. एच.खरमाटे, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, तालुका कृषी अधिकारी सुवर्णा आदक, गटविकास अधिकारी महेश डोके, सहाय्यक निबंधक अरुण साकोरे, भूमिअभिलेखचे उपअधीक्षक अमोल भोसले, महावितरणचे उपअभियंता सुमित जाधव, पुरवठा विभागाचे अधिकारी सदाशिव व्होनमाने, दिपक केदार, वैधमापन निरीक्षक संतोष दराडे, कृषी सहाय्यक अधिकारी जयवंत भगत , सि.टी. बोरा कॉलेजचे प्रा. वणवे आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी ग्राहक पंचायत संस्था पुणे जिल्हा या संस्थेचे राज्य अध्यक्ष अशोक भोरडे, राज्य सचिव बाबासाहेब थिटे, तालुकाध्यक्ष अरुणकुमार मोटे, तालुका उपाध्यक्ष साहेबराव लोखंडे, खजिनदार तेजस फडके, सचिव उद्धव जाधव, संघटक बापूसाहेब शिवले, सहसचिव शौकत शेख, प्रसिद्धीप्रमुख योगेश शेंडगे, बाळासाहेब चव्हाण, आबासाहेब थोरात व विविध विभागांचे कर्मचारी, संघटनेचे कार्यकर्ते, नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.