शुभम वाकचौरे
शिरूर: शिरूर येथे येशू जन्मोत्सव मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला.येशू जन्मोत्सवाचे आयोजन येशू जन्मोत्सव समिती शिरूर तालुक्याच्या वतीने करण्यात आले. या जन्मोत्सवा मध्ये प्रथम स्तुती आराधना पास्टर प्रशांत गायकवाड यांच्या टीम द्वारे व तालुक्यातील चर्च मधील कॉयर ग्रुप द्वारे गीत गायन झाले व मान्यवरांचे सत्कार गुलाब पुष्प व शाल देऊन करण्यात आले. त्यानंतर तालुक्यातील सर्व पास्टर संतोष खोतकर, तुषार कांबळे ,संतोष गोरखे, निलेश विभुते ,फ्रान्सिस महांकाळे, फुलसिंग मावळे , महेश शिंदे , प्रशांत घोडे , विल्सन भोसले ,विनोद वाघमारे ,दीपक जगधने, सुनील बरे , सुधीर कोनेसागर , कोमल भगवे , कमल साळवे ,सुजाता टाव्हरे , बद्रीप्रसाद विश्वकर्मा , इंद्रजित राऊत ,संजय गाजरे, शाम पठारे , प्रवीण कदम व सर्व चर्च मधील लीडर यांचा सत्कार शाल व सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला.
या येशू जन्मोत्सवानिमित्त सर्वांसाठी प्रार्थना करण्यात आली. व पवित्र शास्त्रातील वचनाद्वारे बोध करण्यात आला. यावेळी देवाचे दास पा. डॅनियल शिंदे बोलत होते. की येशू ख्रिस्त हा जात धर्म बदलण्यासाठी नाही आला. तर जीवन बदलण्यासाठी आला आहे. येशू ख्रिस्त हा जगामध्ये सर्वांना प्रेम , शांती देण्यासाठी, व त्यांच्या पापातून सोडवण्यासाठी आला . आणि परमेश्वराने येशू द्वारे स्वतःला प्रगट केले. असे पवित्र शास्त्रातील वचना द्वारे सांगण्यात आले.
यावेळी मा.आमदार अशोक पवार, अनंता कटके, नाथा पाचर्णे , राष्ट्रवादी काँग्रेस शिरूर शहराध्यक्ष व मा. नगरसेवक मुज्जफर कुरेशी , जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती व मा. नगरसेवक विनोद भालेराव , शिवसेना शहराध्यक्ष व मा. नगरसेवक संजय देशमुख , बहुजन मुक्ती पार्टी शिरूर सचिव सागर घोलप,रवींद्रजी खांडरे , प्रदीप बारवकर, बिजवांत शिंदे , हरिभाऊ विर , विशाल जोगदंड ,अर्शद शेख , राहील शेख , बामसेफ चे नितनवरे सर , कांबळे सर , शिवसेनेचे अविनाश जाधव , लहुजी शक्ती सेनेचे शहर अध्यक्ष सोनू काळोखे , शैलेश गुप्ता , प्रशांत टकले , अक्षय गायकवाड, गणेश गायकवाड , सेंड जोसेफ स्कूल सचिव नॅन्सी पायस,राष्ट्रवादी काँग्रेस महिला पदाधिकारी सविता काळे, सविता बोरुडे, प्रीती बनसोडे व शिरूर शहरातील इतर मान्यवर व ख्रिस्ती समाज बहुसंख्येने उपस्थित होते . या कार्यक्रमा प्रसंगी सर्व बांधवांना येशू जन्मोत्सवाच्या मा. अशोक पवार , अनंता कटके , विनोद भालेराव , मुजफ्फर कुरेशी, संजयजी देशमुख , नाथाभाऊ पाचर्णे , नितनवरे सर , नॅन्सी पायस यांनी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे आयोजन शिरूर तालुका पास्टर फेलोशिप चे सर्व पास्टर , शिरूर तालुका येशू जन्मोत्सव समितीचे सकल ख्रिस्ती समाजाचे शिरूर तालुका अध्यक्ष युवराज राजू सोनार ,शिरूर तालुका कार्याध्यक्ष ऍड.अमोल पठारे ,विपुल राऊत सर , मधुकर सेनानी,अजिंक्य सुर्यवंशी, अरुण रणदिवे ,संकेत पाडळे , तेजस विभुते , राज शिंदे , विनोद चोथमल, सनी भिंगारदिवे , व सर्व तालुक्यातील चर्च मधील लीडर यांनी केले होते.
या कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन ऍड. अमोल पठारे व विपुल राऊत यांनी केले.तर आभार युवराज सोनार यांनी मानले.