शुभम वाकचौरे
बहुजन मुक्ती पार्टी च्या निरंतर पाठपुराव्यातून आणि तक्रारी ग्रुप वरील मागणीनुसार शिरूर नगरपरिषद ने शहरातील भटकी कुत्र्यांचे लसीकरण आणि निर्बिजीकरण करण्याच्या मोहिमेला आखेर सुरुवात केली आहे.भटकी आणि पिसाळलेल्या कुत्र्यांच्या हल्ल्यातून मागील वर्षभरात अनेक लहान मुलांना, महिलांना, पुरूषांना गंभीर दुखापत होऊन अनेकांचे जिव धोक्यात आले होते.,त्यामुळे भटकी कुत्र्यांचे तातडीने बंदोबस्त करणे अत्यंत गरजेचे होते परंतु अनेक तांत्रिक अडचणी मुळे हे काम रखडलेले होते.परंतु आता लसीकरण आणि निर्बिजीकरण मोहीमेला आखेर सुरूवात झालेली आहे.
त्यामुळे नागरिकांना आव्हान करण्यात येते की आपल्या परिसरातील जास्तीत जास्त भटकी आणि पाळीव कुत्र्यांचे लसीकरण आणि निर्बिजीकरण करून घेण्यासाठी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना आवर्जून आग्रह करावा.जेणेकरून या भटकी कुत्र्यांच्या समस्येचे समूळ निराकरण व्हावे.यासाठी सोशल मीडिया च्या माध्यमातून तक्रारी ग्रुप निर्माण करणारे आणि त्यावर सक्रियतेने सहभाग घेणार्या सर्व सदस्यांमुळे हा गंभीर प्रश्न मार्गी लागला आहे.शिरूर शहरातील लोकांनी याबद्दल बहुजन मुक्ती पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचे मा.फिरोजभाई सय्यद कार्याध्यक्ष पुणे जिल्हा,मा.समाधान लोंढे शिरूर शहराध्यक्ष,मा.सागरभाऊ घोलप सचिव शिरूर शहर,मा.अशोकभाऊ गुळादे शिरूर शहर संघटक यांचे आभार व्यक्त केले.