ओझर विभागात पशुवैद्यकीय जागा रिक्त असल्यामुळे शेतकऱ्यांना त्याची लाखो रुपयाची झळ सोसावी लागते.
जुन्नर प्रतिनिधी – सचिन थोरवे
जुन्नर तालुक्यातील ओझर या विभागात अनेक दिवसापासून पशुवैद्यकीय दवाखान्यातील जागा रिक्त असल्यामुळे या विभागात येणाऱ्या शेतकऱ्यांना त्याची लाखो रुपयाची किंमत मोजावी लागत आहे. जुन्नर तालुक्यातील धालेवाडी हे गाव ओझर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अंतर्गत येत असून येथील शेतकऱ्यांच्या गाई म्हैस बैल शेळ्या मेंढ्या भरपूर प्रमाणात असताना देखील येथे सरकारी डॉक्टर नसल्यामुळे येथील जनावरांना खरखूत लंपी यासारख्या आजाराची लस खासगी डॉक्टर यांच्याकडून जनावरांना देण्यात येते परंतु त्यासाठी अधिक चे पैसे त्यांना त्या ठिकाणी मोजावे लागतात आणि हे लसीकरण वेळेत न झाल्यास त्याचा लाखो रुपयांचा फटका देखील येथील शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे त्यामुळे या ठिकाणी लवकरात लवकर पशुवैद्य अधिकारी यांची नेमणूक करावी अशी मागणी धालेवाडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच सचिन विधाटे यांनी केली आहे.
लंपि या आजाराने मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी यासाठी खेडचे पशु वैद्यकीय उपायुक्त यांच्याशी फोन द्वारे संपर्क केला असता लंपी आजारात ज्यांची जनावरे दगावली असली तरी त्यांना मदत मिळणे विषयीचा कुठलाही जीआर शासनाने आम्हाला पाठवला नसल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले याशिवाय प्रत्येकाने आपला गोठा निर्जंतुकीकरण करून तो स्वच्छ ठेवावा असेही त्यांनी सांगितले.