वन्यजीव प्राणी संरक्षण कायदा रद्द करावा शेतकरी संघटनेची मागणी.

जुन्नर -प्रतिनिधी सचिन थोरवे

जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी या वाडी गाव मध्ये 25 /09 /2024 रोजी सकाळी सहा वाजता राजू शिंदे यांच्या वीट भट्टीवर कामात आलेल्या जाधव कुटुंबातील नववर्षीय रुपेश जाधव हा सकाळी वीट भट्टीवर राहण्यासाठी बांधलेल्या झोपडीतून बाहेर आला असता शेजारीच सोयाबीनच्या शेतात दडून बसलेल्या बिबट्याने त्यावर हल्ला चढवला आणि आणि शेजारील उसामध्ये घेऊन गेला आजूबाजूच्या लोकांनी आरडाओरडा केला असता बिबट्या त्याच ठिकाणी या बालकाला सोडून पळाला परंतु डोक्याला फार मोठ्या प्रमाणात जखमा असल्यामुळे त्याचा त्याच ठिकाणी मृत्यू झाला.

त्यानंतर त्या ठिकाणी अनेक राजकीय आणि सामाजिक संस्थांनी भेटी देऊन कुटुंबांचे सांत्वन केले परंतु यावर काही ठोस उपाय म्हणून वन विभागाने कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नसून हा मुलगा सर्वसामान्य कुटुंबातील असल्यामुळे वन विभागाला आज ते सोयीस्कर वाटले असले तरी भविष्यात याच घटनेचा उद्रेक होणार नाही याची वन विभागाने काळजी घ्यावी आणि वनविभागाने भयभीत झालेल्या नागरिकांना त्यांच्या संरक्षणासाठी आवाजाचे बंदूक बॅटरी आणि काठी याचे वाटप करावे अशी सर्वसामान्य जनतेची मागणी आहे. त्याचप्रमाणे वन्यजीव प्राणी संरक्षण कायदा रद्द करावा आणि वन्यजीव प्राण्यांपासून नागरिकांचे संरक्षण हा कायदा पारित करावा ही शेतकरी संघटनेची मागणी असून शासनाने त्यावर योग्य ते विचार करावा आणि सर्व सामान्य नागरिकांना न्याय द्यावा.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button