शुभम वाकचौरे
आलेगाव पागा ता. शिरूर जि. पुणे फिर्यादीचे घरासमोरील पढवीत अल्पवयीन पीडितेच्या इच्छे विरूध्द तीच्या सोबत वेळोवेळी शारीरीक संबंध केल्याची घटना उघडकीस आली आहे.या प्रकरणात आरोपी अशोक सोनवणे रा. आलेगाव पागा याच्या विरुद्ध शिरूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादी ची मुलगी (वय 13) वर्षे हीला मी तुझे आजीला तुझे नाव सांगेन अशी धमकी देउन तीचे इच्छे विरूध्द तीचे सोबत वेळोवेळी शारीरीक संबंध केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अशोक सोनवणे रा. आलेगाव पागा याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता.कलम .64 (2) (M) (1), 65 (1) सह बाल लैंगीक अत्याचारापासुन संरक्षण अधि. 2012 चे कलम 4,8,12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गीरी हे करत आहेत.