प्रतिनिधी : जिजाबाई थिटे
श्री भैरवनाथ माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय आलेगाव पागा येथे नवीन शैक्षणिक वर्ष 2025 -26 साठी विद्यालयात शाळा प्रवेश उत्सव अंतर्गत नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे विद्यालयातील सर्व शिक्षकांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले त्याचबरोबर शासकीय धोरणानुसार शाळेच्या पहिल्याच दिवशी 5 वी ते 8 वी तील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आली. विद्यालयाचे प्राचार्य तुकाराम बेनके यांनी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले व विद्यालयात राबवत असलेल्या उपक्रमाची माहिती सांगितली.याप्रसंगी बोलताना प्राचार्य तुकाराम बेनके यांनी शिक्षणामध्ये स्पर्धा असून विद्यार्थ्यांनी मोबाईल सारख्या प्रलोभनांपासून दूर राहून आपल्या आयुष्याला आकार देण्याचा प्रयत्न करावा असे आव्हान केलेयावेळी उपप्राचार्य संभाजी कुटे,प्राध्यापक संतोष शेळके संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अनिकेत बेनके,संतोष हिंगे,दिलिप वाळके,अंबादास गावडे,नितीन गरुड,देविदास कंठाळे, शरद शेलार, सुप्रिया काळभोर, ज्योती गजरे,सिध्दार्थ गायकवाड,रविंद्र चौधरी, बाबुराव मगर,मच्छिंद्र बेनके, वैभव लाड,सतिश अवचिते,प्राजक्ता शितोळे,इ.शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.