गोलेगाव ( प्रतिनिधी ) चेतन पडवळ
गोलेगाव (ता शिरूर) रस्त्यावर दुचाकीवरील इसमास थांबवून आम्ही पोलिस आहोत पुढे चेकिंग चालू आहे अशी भीती दाखवत त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन व हातातील दोन अंगठ्या असा एकूण साडेतीन लाख रुपये ऐवज दुचाकीवरील दोन चोरट्यांनी घेऊन पोबारा केला आहे. याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे दोघाजणांवर रोड रॉबरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विजय गणपत जासूद (वय ८० वर्षे रा. चव्हाणवाडी ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोलेगाव ता. शिरुर येथील गुंजाळवस्ती येथील शिरुर गोलेगाव रस्त्याने विजय जासूद हे त्यांच्या ताब्यातील दुचाकीहून चाललेले असताना पाठीमागून दुचाकीहून आलेल्या दोघा अज्ञातांनी त्यांना आवाज देत थांबवून आम्ही पोलीस असल्याचे सांगत पुढे चेकिंग चालू आले असे सांगत विजय जासूद यांच्या गळ्यातील सोन्याची चैन तसेच हातातील दोन अंगठ्या असा साडेतीन लाख रुपयांचा ऐवज काढून घेऊन त्यांच्या दुचाकीहून पोबारा केला, याबाबत विजय गणपत जासूद वय ८० वर्षे रा. चव्हाणवाडी ता. शिरुर जि. पुणे यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी दोन अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण हे करत आहे.