टाकळी हाजी ( पुणे ) : शेख शौकत

किक बॉक्सिंग स्पोर्टस असो. महाराष्ट्र अयोजीत राज्यस्तरीय स्पर्धाच्या खेळाडू निवड प्रक्रिया पुणे जिल्हा ग्रामीण स्तरावर राजगुरूनगर खेड येथे रविवार दि.१५ रोजी पुणे जिल्हा प्रमुख शिवसेना श्री.सुरेश भाऊ भोर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच कार्यक्रमाचे उद्धघाटक खेड तालुका आमदार श्री. बाबाजीशेठ काळे तसेच अश्वमेघ फाऊडेशन अध्यक्ष अक्षय जाधव,नगरसेवक मंगेश गुडाळ सचिन शिवनीकर यांच्या उपस्थितीन पार पडल्या.

या प्रसंगी खेड तालुक्याचे आमदार बाबाजीशेठ काळे यांनी मार्गदर्शन करत जिल्हा राज्यस्तरावर किक बॉक्सिंग खेळाडूंना सर्वतोपरी सहकार्य करणार असून ग्रामीण खेळाडूंना प्रोत्साहान देणार आसल्याचे सांगितले.या स्पर्धेत ग्रामीण भागातील विविध तालुक्यातील खेळाडूंनी सहभाग घेत आपल्या मेहनत,प्रयत्नाने राज्य स्पर्धेत आपली जागा निश्चित केली आसल्याच पुणे जिल्हा अध्यक्ष सतिश राजहंस यांनी प्रतिक्रिया दिली.महाराष्ट्र अध्यक्ष निलेश शेलार यांनी किंकबॉक्सिंग स्पर्धेच्या माध्यमातुन खेळांडूना ग्रेस गुण, ग्रामीण खेळाडूंची स्वप्न ध्येय याबाबत मार्गदर्शन करत राज्यस्तरीय किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२५ दि.२६ जून ते२९ जूनला पुणे हिंजवडी येथे आयोजीत करत आसल्याचे सांगितले.यावेळी आयोजक प्रो स्पोर्टस ॲण्ड मार्शल आर्टस अध्यक्ष प्रतिक नेवसे याची पुणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष पदी निवड झाली. त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. शहरा अध्यक्ष रुपेश परदेशी,नॅशनल पंच शिवानी राजहंस, खजिनदार ओमकार राठोड, महाराष्ट्र कोच राम सोनुने, श्रावणी राजहंत, नलीनी शर्मा पुणे ग्रामीणचे नागेश काळभोर, कैलास महानोर, नितीन वैरागर सह संपूर्ण ग्रामीण टिम यांनी स्पर्धा यशस्वी पार पाडली .

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button