शुभम वाकचौरे
जांबूत : शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी कुंडलीक ज्ञानदेव गाडीलकर बॅच नं. ४५१५४ वय-५२ वर्षे व्यवसाय-नोकरी रा. टाकळीहाजी, शिनगरवाडी ता. शिरूर जि.पुणे यांनी पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे. सविस्तर हकीकत अशी की. दि .२९ रोजी २.१० वा. चे दरम्यान मौजे जांबुत गावचे हद्दीतील पंचतळे येथील चौकात एस.टी. बस थांब्यावर बस थांबवली असता, एस.टी. बस नं. एम एच 14 बी.टी. ४२७९ यामधुन प्रवाशी उतरत असताना राहुल सोनवणे याने त्याचे ताब्यातील डंम्पर बसच्या समोर उभा केला. फिर्यादी यांनी राहुल सोनवणे यास सदरचा डंम्पर बाजुला घे असे म्हणाले असता त्याने चालक कुंडलीक ज्ञानदेव गाडीलकर तसेच वाहक शांताराम मारूती रासकर यांना शिवीगाळ दमदाटी करून हाताने मारहाण करून, ढकलुन देवून फिर्यादी करत असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला आहे. म्हणुन फिर्यादी यांनी इसम नामे राहुल सोनवणे रा. जांबुत ता. शिरूर जि. पुणे याचे विरूध्द रितसर तक्रार दाखल करून भारतीय न्याय संहिता कलम १३२ ,१२१(१) , ३५२,३५१(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरूर पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हवालदार खेडकर करत आहे.