शुभम वाकचौरे
शिरूर पोलीस स्टेशन गु.रजि.नं. ६२६/२०२४ भा.दं.वि.क. ४२०,४०९, ४६७,४६८,४७१, १२० (ब), ३४ सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९ चे कलम ३ व ४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन यातील फिर्यादी नामे संजयकुमार राखाराम मुंडे, वय ५६ वर्ष, रा.लेजर टाऊन, हडपसर, पुणे यांनी फिर्याद दिली की, दि.३१/१२/२०१३ ते दि. २०/०२/२०२० या कालावधीमध्ये आनंद नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शिरूर, ता. शिरूर, जि.पुणे या संस्थेमधील अध्यक्ष, भागीदार व कामगार यांनी मिळून कट करून खोटे व बनावट दस्तऐवज तयार करून आनंद नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शिरूर, ता. शिरूर, जि. पुणे या पतसंस्थेच्या सभासदांची व ठेवीदारांची एकुण १६,७०,५४,३६१/- रू. किंमतीची फसवणुक केली असल्याची फिर्यादी यांनी केलेल्या ऑडीट मध्ये निष्पन्न झाल्याने त्याबाबत त्यांचे फिर्यादीवरून दि.०९/०७/२०२४ रोजी गुन्हा दाखल झालेलाआहे.
महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९ कायदया अंतर्गत वरील गुन्हयातील आरोपीत यांचे व त्यांचे फर्मचे नावे असलेले १) १५,००,०००/- रू एक लाल रंगाचा ट्रक तीचा आरटीओ नं. एमएच १२ पीक्यु ६८८४ ही मेघहंस सेल्स फर्मचे (अभयकुमार चोरडीया व प्रविण चोरडीया) यांचे नावे असलेले जु.वा. कि.अं. २) ८,००,०००/-रू. एक पांढरे रंगाचा टेम्पो तीचा आरटीओ नं. एमएच १२ एनएक्स ८६३९ ही मेघहंस सेल्स फर्मचे (अभयकुमार चोरडीया व प्रविण चोरडीया) यांचे नावे असलेले जु.वा. कि.अं. ३) ८,००,००० /- रू. एक पिवळया रंगाचा टेम्पो तीचा आरटीओ नं. एमएच १२ क्युडब्ल्यु ४५३७ ही मेघहंस हंसराज अॅन्ड सन्स फर्म चे (अभयकुमार चोरडीया, प्रविण चोरडीया व इतर २) यांचे नावे असलेले जु.वा. कि.अं. ४) ५,००,०००/- रू एक पांढरे रंगाचा पिकअप तीचा आरटीओ नं. एमएच १२ पीक्यु ६९३७ ही मेघराज हंसराज इंटरप्रायजेस फर्मचे (प्रविण चंपालाल चोरडीया) यांचे नावे असलेले जु.वा. कि.अं. ५) ४,००,०००/- रू एक पांढरे रंगाचा टाटा कंपनीचा छोटा हत्ती तीचा आरटीओ नं. एमएच १२ डब्ल्यु एक्स १११४ ही मेघराज हंसराज इंटरप्रायजेस फर्मचे (प्रविण चंपालाल चोरडीया) यांचे नावे असलेले जु.वा. कि.अं ६) ३०,००० /-रु. एक पांढरे रंगाची होंडा एक्टीव्हा स्कुटी मो. सायकल तीचा आरटीओ नं. एमएच १२ एच वाय ६१३२ ही प्रविण चंपालाल चोरडीया यांचे नावे असलेली जुवा. कि.अं. ७) ३०,०००/- रू. एक पांढरे रगाची टीव्हीएस स्कुटी मो. सायकल तीचा आरटीओ नं. एमएच १२ एल क्यु ७५५२ ही प्रितम प्रविण चोरडीया यांचे नावे असलेली जु. वा. कि.अं. ८) ४०,०००/- रू. एक ग्रे रंगाची होंडा स्कुटी मो. सायकल तीचा आरटीओ नं. एमएच १२ आरआर ६९९७ ही सविता अभयकुमार चोरडीया यांचे नावे असलेली जु.वा. कि.अं. ९) ५०,०००/- रू. एक काळया रंगाची टिव्हीएस जुपीटर स्कुटी मो. सायकल तीचा आरटीओ नं. एमएच १२ पीके ६५४२ ही अभयकुमार पोपटलाल चोरडीया यांचे नावे असलेली जु.वा. कि.अं.असे एकुण ४१,५०,०००/- रु किंमतीचा माल जप्त करण्यात आलेला आहे.
वरील कार्यवाही मा. श्री. पंकज देशमुख पोलीस अधीक्षक सो।, मा. श्री. रमेश चोपडे अपर पोलीस अधिक्षक सेोा, पुणे व मा. श्री. प्रशांत ढोले उपविभागीय पोलीस अधिकारी सो, शिरूर यांचे मागदर्शनाखाली श्री. संदेश केंजळे पोलीस निरीक्षक, शिरूर पोलीस ठाणे, सहा. पोलीस निरीक्षक दिपक करांडे, पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार, पोहवा नितीन सुद्रिक, पाहवा राहुल भवर, पोअ आकाश नेमाणे, पोअ विरेंद्र सुंबे, पोअ ज्ञानदेव गोरे यांनी परीश्रम घेतले आहेत.