दिनांक 4 जून 2025 भिंगार कॅम्प येथील आर्मी कॅन्टीन परिसरातून एक 73 वर्षीय माजी सैनिक बेपत्ता होण्याची घटना समोर आली आहे. शिवाजी शंकर वामन असे या बेपत्ता व्यक्तीचे नाव असून, ते मूळचे मांडवगण, जिल्हा अहिल्यानगर येथील रहिवासी आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 4 जून रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ते आपल्या मुलासोबत आर्मी कॅन्टीनमध्ये गेले होते. साहित्य खरेदी करण्यासाठी मुलगा कॅन्टीनमध्ये गेला असता, वडील बाहेर निघून आले होते. मात्र, दुपारी दोनच्या सुमारास ते कॅन्टीनच्या बाहेरून कुठेतरी न सांगता निघून गेले. सायंकाळी 5 वाजता मुलगा बाहेर आल्यावर वडील गायब असल्याचे लक्षात आले. नातेवाईकांकडे, घरी व परिसरात शोधाशोध करूनही ते सापडलेले नाहीत.बेपत्ता झालेल्या व्यक्तीचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे:वय 73 वर्षे, उंची 5 फूट 8 इंच, रंग सावळा, पांढरे केस व मिशी, अंगाने मजबूत. त्यांनी अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट, आर्मी रंगाची पँट, पायात विटकरी रंगाचे बूट घातले होते. त्यांच्यासोबत MH 17L 9462 क्रमांकाची काळ्या रंगाची स्प्लेंडर मोटरसायकल होती.वामन कुटुंबीयांनी नागरिकांना विनंती केली आहे की, जर कोणी या वर्णनातील व्यक्तीला पाहिले असल्यास कृपया 9689058467 किंवा 8380078728 या क्रमांकावर संपर्क साधावा, अथवा जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये माहिती द्यावी.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button