जुन्नर प्रतिनिधी: सचिन थोरवे

सावरगाव गावाच्या नजीकच असलेल्या जुंदरे मळा ठिकाणी 04 -04 -2024 रोजी मध्यरात्री 12:30 ते 3:30 या सुमारास शेतकरी कृष्णकांत ढमढेरे यांच्या राहत्या घराच्या समोर असलेल्या शेड मधून 35 कट्टे सफेद रंगाच्या पिशवीत असलेल्या सोयाबीन ची चोरी झाली. पोलीस तपासाला गेले असता सोयाबीन आरोपीने चोरून नेताना ते रस्त्यावर सांडल्याचे त्यांच्या निदर्शनात आले आहे. सदर प्रकरणाचा तपास लवकरात लवकर होऊन शेतकऱ्याला न्याय मिळावा यासाठी जुन्नर तालुक्यातील सर्व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी त्यामध्ये अंबादास हांडे संजय भुजबळ अजित दादा वाघ अजित नाना वालझडे प्रमोद खांडगे योगेश तोडकर राजेंद्र ढोमसे डॉक्टर गणपतराव डुंबरे सचिन थोरवे हे प्रयत्न करणार आहे.

सोयाबीन अंदाजे 2100 किलो वजन इतके असून चोरी गेलेल्या सोयाबीनची अंदाजे किंमत नव्वद हजार तीनशे इतकी असून चोरी करणाऱ्या अज्ञात व्यक्तींवर जुन्नर पोलीस स्टेशन मध्ये 04 -04- 2024 रोजी गुन्हा दाखल केल्याचे जुन्नर पोलीस स्टेशनचे पी एस थोरात यांनी सांगितले त्याचप्रमाणे आपण उघड्यावरती किमती वस्तू ठेवू नये असे आव्हान त्यांनी केले असून सदर सोयाबीन चोरीचा तपास जुन्नर पोलीस स्टेशनचे उपविभागीय अधिकारी रवींद्र चौधर आणि पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर पोलीस स्टेशनचे पी एस थोरात हे पुढील तपास करीत आहे.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button