शुभम वाकचौरे

वडनेर , खुर्द ( तालुका : शिरूर) आत्ताउल्ला उर्फ मोईन साबीर खान वय 22 वर्ष राहणार चेंबूर मुंबई या तरुणाचा कुऱ्हाडीने हल्ला करून खून करण्यात आला आहे. आरोपी शाहिद रफिक बागवान .राहणार , जाम मोहल्ला भुसावळ तालुका , भुसावळ जिल्हा , जळगाव या आरोपीने कुऱ्हाडीच्या साह्याने गळ्यावर व कपाळावर वार करून खून केला आहे.

ही घटना गुरुवार दिनांक २४/०८/२३ सायंकाळी ६.३० दरम्यान ही घटना घडली आहे या घटनेची फिर्याद देविदास विष्णू मोकाशी वय २१ व्यवसाय शेती राहणार वडनेर खुर्द तालुका शिरूर जिल्हा पुणे यांनी या घटनेची फिर्याद शिरूर पोलीस स्टेशन येथे दिली आहे.

या घटनेची माहिती मिळताच शिरूरचे पोलीस निरीक्षक जगताप यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोलीस उपनिरिक्षक सुनील उगले, पोलीस अंमलदार दिपक पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button