शुभम वाकचौरे
शिरूर पोलीस ठाणे रेकॉर्डवरील फरार आरोपी बाबत पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम घेण्याबाबत आदेशीत केले होते. त्या अनुशंगाने शिरूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाने शिरूर पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर १४९/२०२२ कलम ३९५ प्रमाणे गुन्हा दाखल असुन सदर गुन्हयातील फिर्यादी नामे महंमद आलम अब्रार सिद्धिकी, वय ३२ वर्ष, धंदा कोंबडया विक्री व्यवसाय, रा. लोकसेवा समिती, इंदिरानगर, आर एस मार्ग मालाड ईस्ट, मुंबई ९७ यांनी फिर्यादी दिली की त्यांचा कोंबड्या घेवुन जाणारे टेम्पोवर आरोपीत व त्यांचे इतर ७ साथीदार यांनी दरोडा टाकुन दरोडयामधुन मिळालेल्या कोंबडयांपैकी १२४० कोंबडया के जी एन बॉयलर्स शॉप नं ७, शिरढोण, पनवेल रायगड यांना विक्री करून सदर विक्रीतुन आलेली ४,१८,३६० रू ही रकमेपैकी २,८८,०००/- रू आरोपी यांनी वाटुन घेतली आहे. उपरोक्त प्रकरणातील गुन्हा घडल्यापासुन आरोपी नामे प्रदिप उर्फ प्रदयुमन हरीश्चंद्र शिंदे रा. करंजेनगर शिक्रापुर ता. शिरूर जि.पुणे हा फरार होता. त्याचा शोध घेत असताना त्यास शिरूर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने गुप्त माहीतीचे आधारे शिक्रापूर परीसरातुन शिताफीने ताब्यात घेवुन त्यास उपरोक्त गुन्हयाचे कामी अटक करण्यात आली आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधिक्षक पंकज देशमुख , अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे , मा. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले , पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांचे मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक हणमंतराव गिरी, पोलीस हवालदार परशराम सांगळे, नाथसाहेब जगताप, विनोद मोरे, पोलीस अमंलदार विजय शिंदे, निरज पिसाळ, निखील रावडे, नितेश थोरात, सचिन भोई, रघुनाथ हळणोर, यांचे पोलीस पथकाने केली आहे.