प्रतिनिधी- सचिन थोरवे
जुन्नर तालुक्यातील नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये नारायणगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी महादेव शेलार यांनी एक वर्षापूर्वी नारायणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत झाले. आणि तेव्हापासून त्यांच्या पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अनेक अवैध धंदे बंद करण्यासाठी त्यांनी शर्तीचे प्रयत्न केले असून चोरीच्या घटनांमधील अनेक आरोपी त्यांनी 24 तासात अटक करून सर्व सामान्य माणसाला न्याय देत आहेत दिनांक 01 ऑक्टोबर 2024 रोजी नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीत धनगरवाडी येथे अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू/ताडी विकली जात असल्याची गोपनीय माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी महादेव शेलार यांना मिळाली होती त्या अनुषंगाने त्यांनी पोलीस हवलदार संतोष कोकणे, महिला पोलीस हवालदार तनुश्री घोडे, पोलीस शिपाई दत्ता ढेंबरे, गोरक्ष हासे, गंगाधर कोतकर, निचीत, महिला पोलीस शिपाई बुचके या पोलीस स्टाफसह सदर ठिकाणी छापा टाकून महिला नामे प्रिया उमेश मारवाडी वय 28 वर्षे राहणार धनगरवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांचे घराचे पाठीमागे तयार केलेला गावठी हातभट्टीचा अड्डा उध्वस्त करत 12,000/- रुपये किमतीची 120 लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली असून सदर बाबत गुन्हा दाखल केला आहे.
या परिसरात विघ्नहर कारखाना असून गळीत हंगाम अगदी काही दिवसांवरती आलेला असताना पुढील काही दिवसात या ठिकाणी अनेक भागातून या ठिकाणी ऊस तोडणी कामगार या ठिकाणी पोटाची उपजीविका भागवण्यासाठी येत असतात आणि त्यावेळी देखील या ठिकाणी हा गावठी हातभट्टी दारू विकण्याचा धंदा या ठिकाणी चालू असतो परंतु नारायणगाव पोलीस स्टेशन ने केलेली ही कारवाई भविष्यात या ठिकाणी कोणी हा व्यवसाय करू नये किंवा त्यांना आळा बसण्यासाठी केलेली सुचक कारवाई म्हणून परिसरात चर्चा आहे.