मोटार सायकल चोरीबाबत ३ गुन्हयात समावेश
जुन्नर प्रतिनिधी : रविंद्र भोर
पुणे ग्रामीण जिल्ह्यात पोलीस स्टेशन रेकॉर्डवर फरार असलेला आरोपींचा शोध घेणेबाबत मा.श्री. अंकित गोयल:- पोलीस अधीक्षक साो.,पुणे ग्रामीण यांनी सर्व पोलीस स्टेशनला सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे ओतुर पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हा प्रमाणे मोटार सायकल चोरी बाबत दाखल गुन्हयातील फरारी असलेला आरोपी अभिषेक उर्फ पांडु अरूण जगधने,रा:-धामणगाव पाट, ता:-अकोले, जि:- अ.नगर याचा शोध घेता तो दि. ३०/८/२०२३ रोजी अकोले, जि.अहमदनगर परिसरात मिळुन आला असुन त्यास दाखल ३ गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
अटक आरोपीस मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो.जुन्नर यांचे समोर हजर केले असता मा.कोर्टाने आरोपीची मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये मध्यवर्ती कारागृह येरवडा येथे रवानगी केली आहे.दाखल गुन्ह्यांचा तपास स.पो.नि.एस.व्ही.कांडगे यांचे मार्गदर्शनाखाली पो.हवा.महेश पटारे पो.हवा. एन. बी. गोराणे व पो. हवा. ए. के.भवारी हे करत आहेत.नमुद आरोपी अभिषेक उर्फ पांडु अरुण जगधने, रा:-धामणगाव पाट, ता:-अकोले, जि:-अहमदनगर सराईत गुन्हेगार असुन त्याचेविरूद्ध ओतुर पोलीस स्टेशन येथे एकुण ५ चोरीचे गुन्हे, संगमनेर शहर पोलीस स्टेशन जि:-अहमदनगर येथे एकुण १३ चोरीचे गुन्हे,अकोले पोलीस स्टेशन जि:-अहमदनगर येथे १ चोरीचा गुन्हा,बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे शहर येथे १ चोरीचा गुन्हा व चिखली पोलीस स्टेशन पिंपरी पुणे येथे १ घरफोडी गुन्हा असे एकुण २१ गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई श्री.अंकित गोयल:-पोलीस अधीक्षक साो.पुणे ग्रामीण,श्री.मितेश घट्टे:-अपर पोलीस अधीक्षक सो.पुणे ग्रामीण,श्री.रवींद्र चौधर:- उपविभागीय पोलीस अधिकारी सो.जुन्नर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली ओतुर पोलीस स्टेशनचे स.पो.नि. एस.व्ही. कांडगे, पो. हवा.नरेंद्र गोराणे, पो.ना.नामदेव बांबळे,पो. कॉ. राजेंद्र बनकर,पो.हवा.महेश पटारे पो. हवा.आनंदा भवारी,पो.ना.देवीदास खेडकर पोलीस मित्र शंकर अहिनवे यांनी केली आहे.