प्रतिनिधी: सचिन थोरवे
जुन्नर १९५ विधानसभा निवडणूक मतदान 20 तारखेला होत असून मतदारांना अनेक ठिकाणी प्रलोभने दाखवून त्याचप्रमाणे वेळप्रसंगी त्यांना दारू देऊन मतदारांना आपल्याकडे प्रयत्न अनेक ठिकाणी केला जातो.
अनेक ठिकाणी विनापरवाना मद्य विक्री देखील केली जाते याचीच नारंग पोलिसांनी दखल घेत नारायणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अनेक गावांमध्ये जुगाराचे अड्डे चालू असल्याची खबर त्याचप्रमाणे वहीतरीत्या दारू विकली जात असल्याची माहिती कळताच नारायणगाव पोलिसांनी नारायणगाव पोलीस स्टेशनचे एपीआय महादेव शेलार यांनी अचानक त्या ठिकाणी जाऊन संबंधितांवर पोलीस विभागाने कारवाई केली आहे. सदर केलेल्या कारवाईमध्ये दोन लाख 96 हजार किमतीची वाहने आणि 926 लिटर हातभट्टी दारू पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आली आहे.