जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
रोहोकडी ता:-जुन्नर येथे वीज चोरी प्रकरणी तिघांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता ऋषीकेश बनसोडे यांनी दिली.याबाबत फिर्याद नोंदविण्यात आली असल्याचे ते म्हणाले.अधिक माहिती देताना सहाय्यक अभियंता ऋषिकेश बनसोडे म्हणाले की बुधवारी दि:-१४ रोजी सकाळी १० चे सुमारास बांबाळे मुख्यतंत्रज्ञ बांबाळे आळेफाटा उपविभाग अंतर्गत तुकाराम विठ्ठल घोलप या PD कनेक्शन तपासणीसाठी रोहोकडी येथे गेले असता या ठिकाणी तपासणी केली.
या ठिकाणी वायर आकडा करून डायरेक्ट कनेक्शन करून अनधिकृत विज वापर चालू होता. वीज वापरदार विजया रोहित घोलप वय ३७ रा. रोहोकडी ता.जुन्नर यांनी मागील ६६३ युनिट्सची वीज चोरी केली असून महावितरण कंपनीचे रु १०६९०/ रुपयाचे आर्थिक नुकसान केले असल्याचे निष्पन्न झाले या रकमेचे वीज चोरीचे बिल त्यांना दिले, नारायण देवराम मुरादे वय ५५ वर्षे,रा.रोहोकडी,ता:- जुन्नर यांनी ६१२ युनिट ची चोरी करून महावितरण कंपनीचे नऊ हजार पाचशे साठ रुपयाचे तसेच आंबेगव्हाण येथील अंबादास बाबुराव वाघमारे (वय ४० वर्षे ५७४ युनिट्स ची चोरी करून महावितरण कंपनीचे नऊ हजार साठ रुपयाचे आर्थिक नुकसान केले असल्याचे अभियंता बनसोडे यांनी सांगीतले.
तपासणी करुन स्थळ पंचनामा आणि जागेवरचा अहवाल बनवला असून वीज चोरी बाबत त्यांच्या विरुद्ध भारतीय विद्युत कायदा २००३ मधील कलम १३५ नुसार कायदेशीर फिर्याद दाखल करत आहे.