शुभम वाकचौरे
शिरूर : दि.०८/०२/२०२४ रोजी शिरूर परिसरात सोशल मिडीया अकाऊंटवर तलवारीसह फोटो दाखवुन तसेच स्वतःजवळ तलवार बाळगुन शिरूर शहरामध्ये दहशत निर्माण करण्याचे काम करीत असल्याची बातमी पोलीस निरीक्षक, जोतीराम गुंजवटे यांना मिळाल्याने त्यांनी सापळा पथक तयार करून पंचाना पाचारण करून बातमीप्रमाणे सापळा रचुन मिळालेल्या बातमीप्रमाणे लाटेआळी व भाजीबाजार शिरूर येथुन सदर इसमांना ताब्यात घेवुन त्याचेजवळुन १,०००/- रू. किंमतीच्या दोन लोखंडी धातुख्या तलवारी जप्त करून आरोपी विरूध्द शिरूर पोलीस स्टेशन येथे १) गु.र.नं.१०८/२०२४ भा.ह.का.क. ४,२५ सह भा.दं.वि.क. ३४ २) गुर.नं.१०९/२०२४ भा.ह.का.क. ४,२५ प्रमाणे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले असुन आरोपी नामे १) अनिकेत अनिल पवार, वय १९ वर्ष, रा.लाटेआळी, शिरूर, ता. शिरूर, जि.पुणे २) सुमित विजय जाधव, वय २१ वर्ष, रा.लाटेआळी, शिरूर, ता. शिरूर, जि.पुणे ३) अजहर जमीन खान वय २२ वर्ष रा. भाजीबाजार, शिरूर, ता. शिरूर, जि.पुणे यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण पंकज देशमुख ,अपर पोलीस अधीक्षक पुणे विभाग रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरूर उपविभाग प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक शिरूर पोलीस स्टेशन जोतिराम गुंजवडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस एकनाथ पाटील, पोलीस नाईक जगताप, पोलीस रघुनाथ हाळनोर, पोलीस नितेश थोरात, पोलीस सचिन भोई यांनी केलेली आहे. गुन्हयांचे तपास पोलीस हवालदार अनिल आगलावे व नाईक विनोद मोरे हे करीत असून आरोपींना आज दि.०९/०२/२०२४ रोजी मा. न्यायालयात रिमांडकामों हजर करणार आहेत.