शुभम वाकचौरे
जांबूत : शिरूर तालुक्यातील जांबूत मध्ये घरकुल घोटाळ्याची चौकशी होऊन तीन महिन्यांपेक्षा अधिक दिवसांचा कालावधी होऊन सुद्धा. आज पर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्यामुळे या प्रकरणात मागासवर्गीय कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टी च्या वतीने बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
जांबुत मध्ये घरकुल घोटाळा प्रकरणातील पीडित मागासवर्गीय कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी व भ्रष्टाचारी अधिकारी यांना पाठीशी घालणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात बहुजन मुक्ती पार्टीने आक्रमक भूमिका घेतली आहे. दोषी तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवकांवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून पिडीत कुटुंबीयांना न्याय द्यावा. या मागणीसाठी बहुजन मुक्ती पार्टी वर्षभरापासून निरंतर पाठपुरावा करत आहे. पंचायत समिती शिरूरचे गटविकास अधिकारी महेश डोके यांनी केलेल्या चौकशी च्या अहवालात अनियमितता झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तरीही कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात. असल्यामुळे जोपर्यंत मागासवर्गीय कुटुंबीयांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत बहुजन मुक्ती पार्टीचे बेमुदत आमरण उपोषण सुरू राहणार असल्याचे उपोषणकर्ते सागर घोलप यांनी सांगितले आहे.
पंचायत समिती शिरूर चे गटविकास अधिकारी यांनी बहुजन मुक्ती पार्टीचे शिरूर शहर सचिव सागर घोलप यांच्या आमरण उपोषणाची तात्काळ दखल घेऊन. दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल केला नाही. तर भ्रष्टाचार करणाऱ्यांना गटविकास अधिकारी पाठिशी घालत आहे. हे समजून बहुजन मुक्ती पार्टी उद्या पासून गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रतिमेला काळं फासून जोडो मारो आंदोलन सुरू करणार आहे.
बहुजन मुक्ती पार्टी कार्याध्यक्ष – फिरोज सय्यद.