शुभम वाकचौरे
शिरूर : शिरूर तालुक्यातील ख्रिश्चन समाजाच्या वतीने पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांचा सन्मान करण्यात आला. शिरूर शहरामध्ये पास्टर फेलोशिप चे आयोजन करण्यात आले होते. या फेलोशिप साठी अनेक वेगवेगळ्या भागातून पाळक वर्ग उपस्थित होता.सर्व पाळक वर्गाच्या वतीने या फेलोशिपमध्ये अध्यक्ष व सचिव पदाची निवड करण्यात आली. पास्टर फेलोशिपच्या अध्यक्षपदी युवराज सोनार यांची निवड करण्यात आली.आणि सचिव पदी अमोल पठारे यांची निवड करण्यात आली आहे. सर्व ख्रिस्ती समाजाचे ऐक्य असल्यामुळे सर्व बांधव एकत्रित आले होते. सर्वांना देवाच्या वचना मधून बोध करण्यात आला. एकत्रित राहून कशी प्रभूची सेवा करावी याविषयी पा.पौल दास यांनी मार्गदर्शन केले.
ख्रिस्ती बांधवांचे हित जोपासण्यासाठी आवश्यक निर्णय यावेळी घेण्यात आले आहे.घेतलेल्या सर्व महत्वाच्या प्रश्नांवर निरंतर पाठपुरावा सुरू ठेवला जाणार आहे.तसेच ख्रिस्ती समाजासाठी कोणकोणते निर्णय भविष्यात उपयोगी ठरतील या विषयी देखील चर्चा करण्यात आल्या आहेत.
धर्म कोणताही असो, तो प्रेम, शांती आणि संयम यांचाच संदेश देत असतो. ख्रिश्चन समाज हा अतिशय शांतीप्रिय समाज असून या समाजाबद्दल सर्वांनाच आदर आहे. ख्रिश्चन समाज हा नेहमी इतरांना वेगवेगळ्या पद्धतीने आनंद देण्याचा व मदत करण्याचा प्रयत्न करत असतो.
या प्रसंगी पा.पौल दास, युवराज सोनार, अमोल पठारे, संतोष खोतकर, महेश शिंदे, कमल साळवे, शीला खोतकर, विजय पंचरास, फुलसिंग मावळे, अरुण भोसले, संकेत पाडळे,निलेश विभुते , कोमल भगवे , सुनील बरे , तुषार कांबळे , फ्रान्सिस म्हणकले, सुधीर कोनेसागर, प्रकाश पाळंदे, प्रवीण कदम, विनोद वाघमारे, संतोष गोरखे, प्रशांत घोडे, इंद्रजीत राऊत आदी उपस्थित होते.