जुन्नर प्रतिनिधी:- रविंद्र भोर
ओतुर पोलीस स्टेशन हद्दित दि.११ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वा. ते दि:- १२नोव्हें- २०२३ रोजी सकाळी ०९.०० वा. चे दरम्यान खिरेश्वर, ता:- जुन्नर, जि:- पुणे येथील शेतकरी राजेंद्र मुरलीधर मेमाने व विकी जोशी यांचे खिरेश्वर गावचे हद्दितील शेतजमिन जवळील पिंपळगाव जोगा धरणाचे पाणी साठ्यातील २ इलेक्ट्रिक मोटार चोरीस गेलेबाबत राजेंद्र मेमाने यांनी दिलेल्या तकारी वरून ओतुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्ह्याचे तपास करीत असताना आरोपी नामे १) किसन चिमा मुकणे, वय २२ वर्षे, रा:-खिरेश्वर, ता:-जुन्नर, जि:-पुणे व २) मोहम्मद हुसेन अब्दुल जब्बार शेख,वय ४५ वर्षे, रा:-डिंगोरे, ता:-जुन्नर, जि:-पुणे यांना दि:-२८ नोव्हेंब रोजी अटक करणेत आली असुन त्यांचेकडुन गुन्ह्यात चोरीस गेलेल्या २ इलेक्ट्रिक मोटारी असा ४०,०००/-रू.चा मुद्देमाल हस्तगत करणेत आला आहे
.[ सदरची कारवाई श्री.अंकित गोयल पोलीस अधीक्षक सो.,पुणे ग्रामीण,श्री.मितेश घट्टे,अपर पोलीस अधीक्षक सो.,पुणे ग्रामीण,श्री.रवींद्र चौधर,उपविभागी- य पोलीस अधिकारी साो.जुन्नर विभाग,यांचे मार्गदर्श- नाखाली ओतुर पोलीस स्टेशनचे स.पो.नि.सचिन कांडगे,पो.हवा. महेश पटारे, पो.ना.नदीम तडवी, पो. ना.संदिप लांडे, पो.कॉ.रोहीत बोंबले,होमगार्ड आशीष क्षिरसागर,विक्रम दुधवडे यांनी केली आहे.