प्रतिनिधी : सचिन थोरवे
दिनांक 30/11/2023 रोजी दुपारी 02/30 वा.ते 3/00 वा. चे दरम्यान नारायणगाव बस स्टँड येथून श्री भिमा भाऊ उनवणे रा. निमगावसावा तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांचा नारायणगाव बस स्टॅन्ड येथून मोबाईल चोरी झाल्याबद्दल नारायणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास हाती घेऊन नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील,पोलीस हवालदार काळुराम साबळे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन सातपुते होमगार्ड अक्षय ढोबळे, होमगार्ड सुरज कुऱ्हाडे यांनी तात्काळ गुन्ह्याच्या घटनास्थळाला भेट देऊन बस स्टॅन्ड येथील सीसीटीव्ही फुटेज चेक करून सदर गुन्ह्यातील संशयित इसम नामे श्री.मनोज देवराम शिर्के रा डोंगरी चाळ,अंधेरी मुंबई यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून आरोपीकडुन चोरलेली बॅग व मोबाईल हस्तगत करण्यात आलेला आहे..
सदर गुन्हयाचा पुढील तपास पो.हवा. काळुराम साबळे हे करत आहेत.
सदरची कामगीरी ही मा.अंकित गोयल सो, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, मा. मितेश घट्टे सो अप्पर पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण, मा.रविंद्र चौधर सो, उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर विभाग व मा.अविनाश शिळीमकर सो स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक महादेव शेलार,पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील, पोलीस हवालदार काळुराम साबळे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन सातपुते, होमगार्ड सुरज कुऱ्हाडे,अक्षय ढोबळे यांनी केली आहे.