जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर
टोकावडे पोलीस ठाणे अंतर्गत असणारे गणेशपूर व मिल्ले गावाच्या शिवारात धनाजी मालु पवार,फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या शेतावर मिले गाव शिवारात एक अज्ञात मयत इसम वय अंदाजे ६०ते६५ वर्ष वयोगटातील यास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून कशाचे तरी साह्याने मारून त्याचा खून करून प्रेतावर पेट्रोल व डिझेल टाकून ते पेटवून देऊन नष्ट करण्याच्या इराद्याने फिर्यादीचे शेतात फेकून देऊन गवतामध्ये भाताच्या पेंढ्यात व गवतामध्ये झाकून टाकून दिले. प्रभारी अधिकारी, टोकावडे स.पो.नि. सचिन कुलकर्णी यांना माहिती मिळाल्यानंतर तात्काळ घटनास्थळी स.पो.नि कुलकर्णी,पो.उ.नि. संसारे, पो.ह.घाग, पो.ह.आहिरे यांनी धाव घेऊन, तात्काळ फिर्यादी- धनाजी मालु पवार, वय५५ वर्ष, रा. गणेशपुर ( मिले ), ता. मुरबाड,जि. ठाणे यांचे फिर्याद घेऊन टोकावडे पोलिस स्टेशन दाखल करून वेगवान तपासाची सूत्रे हाती घेतली.स.पो.नि कुलकर्णी,यांनी स्वतः तपास घेऊन अज्ञात आरोपीचा माग पथकासह घेण्यास सुरुवात केली.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून योग्य ते तांत्रिक विश्लेषण करून सीसीटीव्ही कॅमेरे यांची तपासणी करून अहोरात्र मेहनत घेऊन मयत इसम नामे अशोक लक्ष्मण चौधरी, वय ६१ वर्ष,रा.उदापूर,ता:-जुन्नर असे असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने मयताची ओळख त्यांचे नातेवाईका करवी पटवण्यात येऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
संशयित मुख्य आरोपीच्या शोध घेतला असता सदर आरोपीत संदीप धनाजी पवार, वय ३२ वर्ष, रा. गणेशपुर,पो.मिल्हे,ता.मुरबाड, जि. ठाणे,हा ठाणे शहर हद्दीमध्ये डोंबिवली तसेच विठ्ठलवाडी परिसरामध्ये आपले अस्तित्व लपून राहत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी स.पो.नी कुलकर्णी, पो.उ.नि. संसारे, पो.ह.घाग, पो. ह.आहिरे व पोलीस मित्र राजू पवार असे रवाना होऊन सलग सहा दिवस पाठलाग करून आरोपी गर्दीच्या ठिकाणी तसेच ट्रेनमधून प्रवास करून आपले अस्तित्व लपवताना पुरेपूर तंत्रज्ञानाचा उपयोग करीत असताना स.पो.नि कुलकर्णी व त्यांच्या पथकाने आरोपीस के.के रॉयल रेसिडेन्सी,उल्हासनगर याच्या परिसरातून सापळा रुचून अचूक रित्या दि.२४/११/२३ रोजी ताब्यात घेऊन त्यास अटक करून माननीय न्यायालयात हजर केले.
दि. ३०/११/२३ पर्यंत माननीय न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली असून तपासा दरम्यान आरोपी हा व्यसनाच्या व जुगाराच्या आधीन गेल्याने मयताच्या अंगावरती असणारे तीन तोळ्याची सोन्याची चैन व ४ अंगठ्या याकरिता आरोपीने मयताचा खून केल्याची माहिती मिळाली असून,आरोपी हा मयाताचे नातेवाईकांशी मोबाईलद्वारे व्हाट्सअप चॅट द्वारे तो जिवंत असून त्याला पैशाची गरज आहे असे भासवून पैसे उकळण्याच्या बेतात असतानाच टोकवडे पोलीस ठाण्याने अचूक वेगवान व तपास करून अतिशय गुंतागुंतीचा व क्लिष्ट असा गुन्हा उघडकीस आणल्याने सर्वत्र टोकवडे पोलीस ठाण्याचे तपास तंत्राचे कौतुक होत आहे.