शिवलिंगाच्या चरणी झाले नतमस्तक.
जुन्नर प्रतिनिधी:- रविंद्र भोर
पुणे,ठाणे व नगर जिल्ह्यातील आणि जुन्नर, मुरबाड व अकोले तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या सह्याद्रीचा मानबिंदू म्हणजे हरीचंद्रगडाच्या हेमांडपंथी शिवमंदिर, कपारीत असणारे पाण्यातील प्रचंड शिवलिंग, पुष्करणी, पाण्याची दगडी कातळातील टाक्या, तोलार खिंड, हरिश्चंद्रगड, कोकण कडा,राजा हरीचंद्र,राणी तारामती यांची उंच शिखरे, गणपती कोरीव लेणी, येथील निसर्ग सौंदर्य व ट्रॅकिंगचा आनंद अमेरिकेचे राजदूत मायकल पॅट्रिक हॅन्की यांनी आपल्या नातेवाईकांसह घेतला.तसेच वन्य जीव विभागाच्या अभिप्राय नोंदवहीत निसर्गाचे सुंदर वर्णन करत पुन्हा येण्याची इच्छा व्यक्त केली.
अमेरिकेचे भारतातील राजदूत मायकल पॅट्रिक हँकी हे तोलार खिंड,हरिश्चंद्रगड पाहण्यासाठी उदापुर,डिंगोरे, मढ,पिंपळगाव-जोगा धरणाचे मागील सुरक्षा भिंतीवरून माळशेज खिरेश्वर मार्गे नुकतेच अकोले तालुक्यात आले होते.त्यांच्यासोबत नातेवाईक व मित्र परिवार होता.तोलर खिंडीतून हरिश्चंद्रगडावर ते आले. त्यांनी गडावरील टेंटमध्ये राहण्याचा मनमुरादपणे आनंद घेतला.वन्यजीव विभागाचे वनक्षेत्रपाल डी.डी.पडवळ ,संगमनेर उपविभागाचे पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे,राजूर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांनी त्यांना परिसराची माहिती दिली. याशिवाय अमेरिकेचे राजदूत मायकला हॅकी यांचे जेंव्हा शिवजन्मभूमित आगमन झाले तेंव्हा त्यांच्या सुरक्षा व्यवस्था ही ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी त्यांच्या सर्व सहकारी स्टाफने अगदी रात्रीच्या अंधारात टोलार खिंड ते संपूर्ण हरीचंद्रगडाच्या प्रवासात उत्तम प्रकारे केली याचे कौतुक देखील राजदूतांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली.
अमेरिकेचे राजदूत मायकल पॅट्रिक हॅन्की यांनी नातेवाईकांसह तोलार खिंड,हरिश्चंद्रगड या पर्यटनस्थळांना भेट दिली.निसर्गाचा अविष्कार पाहून ते अत्यंत प्रभावित झाले.भारतासारख्या विकसनशील देशाने देखील निसर्ग जपण्यात याच दुर्गम भागातील आदिवासींचा मोलाचा वाटा आहे हे समजल्यावर त्यांनी आनंद व्यक्त केला.यावेळी वेळ मिळाल्यास पुन्हा हरीचंद्रगडाच्या सानिध्यात येऊन मुक्काम करण्याचा मानस बोलून दाखवला.