शुभम वाकचौरे
राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र राज्य पत्रकार परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र,पुणे विभागीय,पुणे जिल्हा तसेच तालुका निहाय नूतन कार्यकारणी नुकत्याच जाहीर करण्यात आल्या, त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी स्टार पत्रकार विजयराव लोखंडे,तर पुणे जिल्हाध्यक्षपदी सुनील भंडारे पाटील यांची निवड जाहीर करण्यात आली,केंद्रीय संस्थापक अध्यक्ष मधुसूदनजी कुलथे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या सभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला.
यावेळी पुणे जिल्ह्यातील कानाकोपऱ्यामधून पत्रकार उपस्थित होते,या प्रसंगी अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन झाले,कुलथे साहेब यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,पुणे जिल्ह्यामध्ये संघटनेचे काम चांगले चालले आहे, पत्रकारांसाठी पत्रकार भवन,शासन दरबारी पत्रकारांची नोंद,तसेच पत्रकारांची एक पतसंस्था स्थापन करणार असल्याचे त्यांनी सांगितले, संघटनेत काम करत असताना प्रत्येकाने प्रोटोकॉल पाळावा, तसेच पद हे फक्त नामधारी नसून एक जबाबदारी आहे, प्रत्येकाने संघटना वाढीसाठी प्रयत्न करायचे आहे असेही त्यांनी पुढे सांगितले, राज्य मराठी पत्रकार परिषदेचे केंद्रीय संस्थापक अध्यक्ष, आधारस्तंभ, मार्गदर्शक,आदरणीय कुलथे साहेब यांनी स्वतः सर्व निवडी जाहीर केल्या त्या पुढील प्रमाणे, विजयराव लोखंडे (पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष), सुनील भंडारे पाटील (पुणे जिल्हाध्यक्ष),अशोक बालगुडे(पुणे महानगराध्यक्ष),नितीन करडे(पु,वि,अध्यक्ष),संभाजी चौधरी( पु,वि,मुख्य संघटक), साहेबराव आव्हाळे(पु, वि,मुख्य सचिव), गौतम पिसे( पुणे वि, मुख्य कार्याध्यक्ष), गजानन गव्हाणे(पु,वि,उपाध्यक्ष),विजय थोरात(पु,जि,उपाध्यक्ष),गौतम लोखंडे(पु,जि, उपाध्यक्ष),शंकर पाबळे(पु,जि,कार्याध्यक्ष),ज्ञानेश्वर पाटेकर( पु,जि,महासचिव),प्रीती पाठक( पु,जि, संपर्कप्रमुख),विजय हाडवळे(पु,जि,प्रसिद्धी प्रमुख), प्रमोद कुतवळ( पु,जि,मुख्य संघटक), शरद टेमगिरे( पु,जि,संपर्कप्रमुख),पोपटराव मांजरे(हवेली तालुकाध्यक्ष),एकनाथ थोरात(शिरूर तालुकाध्यक्ष), अशा निवडी जाहिरात करण्यात आले असून, राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.