शुभम वाकचौरे

शिरूर पोलीस ठाणे हद्दीतील बेट भागामध्ये लागोपाठ डीपी (रोहीत्र) चोरीचे प्रमाण वाढले होते. शेतकऱ्यांना शेती पिकाला पाणी देण्यासाठी लाईट ही आवश्यक गोष्ट असल्याने त्याच लाईट करीता.असलेली डीपीची (रोहीत्र) चोरी होत असल्याने शेतकरी हवाल दिल झाले होते. व त्याबाबत समाज माध्यमा मधून पोलीसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत होते. त्यामुळे मा. पोलीस अधीक्षक अंकित गोयल पुणे ग्रामीण. यांनी सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी शिरूर पोलीस ठाण्यातील तीन वेगवेगळे पथके तयार करून सतत त्या गुन्हयाचे तपासामध्ये सातत्य ठेवुन. पोलीस पथकाच्या मार्फत गुप्त बातमीदारा मार्फत माहीती काढुन त्याच प्रमाणे रोहीत्र चोरी करणा-या टोळीच्या सतत मागावर राहून रोहीत्र चोरी करण्यात पटाईत असलेली. टोळीतील सदस्य वेगवेगळ्या ठिकाणावरून त्यांना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये १) बाळशीराम तुकाराम सुर्यवंशी वय ५५ वर्षे राहणार बोरी शिरवली तालुका जुन्नर जिल्हा पुणे मुळ राहणार पारगाव मीना घोड संगम तालुका आंबेगाव जिल्हा पुणे २) लघु बबन करंडे वय ३० वर्षे राहणार काठापुर बु तालुका आंबेगाव जिल्हा पुणे ३) रविंद्र राघु सुकरे वय ३४ वर्षे राहणार काठापुर बु तालुका आंबेगाव जिल्हा पुणेयांना ताब्यात घेउन त्यांचे कडे विश्वासात घेउन सखोल तपास करून त्यांचे कडुन असे एकुण १३ रोहीत्र चोरीचे गुन्हेउघडकीस आणले आहेत. वरील आरोपीत यांचे मदतीने रोहीत्र मधील तांब्याच्या तारा विकत घेणारे. १. आफताफ लालसा शेख वय ४१ वर्षे राहणार मालवाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक व २) शिवकुमार शिंदेसरीकुमारचौहाण वय २८ वर्षे राहणार पारगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यांना ताब्यात घेउन त्यांचे कडुन गुन्हयातील गेलामाला पैकी ३३० किलो वजनाची तांब्याच्या कॉईल व पट्ट्या असा एकुण २,३१,०००/- रु. चा माल हस्तगतकरण्यात आलेला आहेत. यातील आरोपीत रामदास जाधव राहणार काठापुर खु तालुका शिरूर जिल्हा पुणे हा फरारीअसुन त्याचा शोध घेणे चालु आहे. यातील आरोपीत यांचेकडे शिरूर पोलीस पुढिल अधिक तपास करीतआहेत.वरील कार्यवाही पोलीस अधीक्षक अंकित गोयल , अपर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे , उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी शिरूर यांचेमागदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय जगताप, शिरूर पोलीस ठाणे, सहायक पोलिस निरीक्षक अमोल’ पन्हाळकर,पोलीस सुनिल उगले, पोलीस एकनाथ पाटील, सहायक फौजदार माणिक मांडगे, पोलीस उमेश भगत,निलेश शिंदे, नाथा जगताप, विनोद मोरे, पोलीस कॉ्स्टेबल सुरेश नागलोत, रघुनाथ हाळनोर, नितेश थोरात,सचिन भोई, विशाल पालवे, दिपक पवार, विष्णु दहीफळे यांच्या पथकाने केली आहे.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button