शुभम वाकचौरे
जांबुत: शिरूर तालुक्यातील अनेक ठिकाणी इलेक्ट्रिक मोटर चोरी, इलेक्ट्रिक वायर चोरी,विद्युतरोहीत्रांमधील तांब्याच्या तारा चोरुन नेल्याच्या अनेक घटना. शिरूर तालुक्यामध्ये घडत होत्या. चोरट्यांचे चोरी करण्याचे सत्र हे सुरूच होते. शिरूर पोलिसांच्या कामगिरीमुळे इलेक्ट्रिक मोटर चोरी करणारी टोळी गजाआड झाली आहे.
पोलीस स्टेशन शिरूर अंतर्गत दाखल गुन्हा रजिस्टर नंबर 839/2023 भादवि कलम 379 , 34 या गुन्ह्यात आरोपी १. सौमित्र नाथा निचित २. विकास बबन निचित३. सागर हौशीराम रणसिंग तिघे राहणार – वडनेर ,तालुका- शिरूर, जिल्हा- पुणे ४. संतोष काशिनाथ मेचे ५. किरण किसन लाळगे दोघे राहणार – पारनेर, जिल्हा- अहमदनगर यांना अटक करून त्यांच्याकडूनअण्णापूर, मलठण ,रामलिंग, आमदाबाद ,वडनेर येथून चोरलेल्या एकूण आठ इलेक्ट्रिक मोटारी किंमत 72000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. व पोलीस स्टेशन शिरूर अंतर्गत दाखल एकूण पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मित्तेश गट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी , पोलीस निरीक्षक संजय जगताप , यांचे मार्गदर्शनाखाली व सूचनेप्रमाणे पोलीस तपास पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोलीस उपनिरीक्षक उगले , पोलीस उपनिरीक्षक पाटील ,पोलिस अंमलदार मांडगे, उमेश भगत, शिंदे, पवार, नागलोत, पालवे, थोरात, भोई, जगताप यांनी केली आहे.