जरांगे पाटील यांना निर्वी येथून पाठिंबा.
निर्वी प्रतिनिधी : शकील मनियार
राज्यात बहुतांश ठिकाणी मराठा आरक्षण मिळण्यासाठी मराठा समाजबांधव एकवटले असून मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेले मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी निर्वी (ता. शिरूर) येथे साखळी उपोषण चालू आहे. सकल मराठा समाज बांधवांकडून राजकीय पक्ष नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषण सुरू केले असून त्यांच्या या लढ्याला बळकट करण्यासाठी निर्वी येथील मराठा समाज बांधवांनी एकत्र येऊन मराठा आरक्षण मिळेपर्यंत निर्वी गावात सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना गावात प्रवेश बंद करण्यात आल्याचे फलक लावण्यात आले आहे.साखळी उपोषणाचा हा पहिला दिवस आहे.पहिल्या दिवशी कु अभिषेक रामदास सोनवणे, दत्तात्रय मारुती जगताप हे साखळी उपोषणास बसले आहे.यावेळी सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते.