विभागीय स्पर्धेसाठी मुलांच्या शूटिंग व्हॉलीबॉल संघाची निवड.
जुन्नर प्रतिनिधी:- रविंद्र भोर
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य,जिल्हा क्रीडा परिषद,जिल्हा क्रीडा अधिकारी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती येथील क्रीडा संकुलामध्ये नुकत्याच पार पडल्या.त्यामध्ये शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेत मुलांच्या १९ वर्षे वयोगटातील समर्थ ज्युनिअर कॉलेज बेल्हे या संघाने प्रथम क्रमांक तर मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावल्याची माहिती प्राचार्या वैशाली आहेर यांनी दिली. समर्थ ज्युनिअर कॉलेज च्या खेळाडूंनी तांत्रिक व कौशल्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन घडवत संयमी खेळी केली.त्यामध्ये वैशिष्टपूर्ण असे जम्पिंग शॉट मारत विजयश्री खेचून आणली.सातत्यपूर्ण सराव, जिद्द, चिकाटी व मेहनत या जोरावर खेळाडूंनी आत्मविश्वास पूर्वक खिलाडू वृत्तीने शूटिंग व्हॉलीबॉल या क्रीडा प्रकारातील सर्व नियमांची अंमलबजावणी करत हा विजय मिळवला असल्याचे क्रीडाशिक्षकडॉ.राजाभाऊ ढोबळे यांनी सांगितले.मुलांच्या शूटिंग व्हॉलीबॉल संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाल्याची माहिती क्रीडा संचालक एच पी नरसुडे यांनी दिली. सदर विद्यार्थ्यांना क्रीडा संचालक एच पी नरसुडे,किरण वाघ,प्रा.संतोष पोटे,प्रा.विनोद चौधरी ,ज्ञानेश्वर जाधव यांनी मार्गदर्शन केले.संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत तसेच संकुलातील सर्व प्राचार्य यांनी विजेत्या संघांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.