शिरूर प्रतिनिधी: फीरोज सिकलकर

26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई शहरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये शहीद झालेले पोलीस अधिकारी व निष्पाप नागरिक यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शिरूर शहरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पाकिस्तानातून समुद्रमार्गे आलेले आठ दहशतवादी मुंबई शहरात प्रवेश करून छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक व ताज हॉटेल या ठिकाणी अंदाधुंद गोळीबार करून निष्पाप नागरिकांचे बळी घेतले असंख्य नागरिकांना रेल्वे स्टेशनवर गोळीबार करून ठार करण्यात आले. यावेळी मुंबई पोलिसांनी आपल्या जीवाची बाजी लावून मुंबई शहरामध्ये ठीक ठिकाणी नाकाबंदी करून दहशतवाद्यांना जिवंत पकडण्याचा प्रयत्न केला. हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामठे, मेजर संदीप उन्नी कृष्णनन, तुकाराम ओंबळे हे अधिकारी शहीद झाले. देशाच्या आर्थिक राजधानीवर झालेल्या भ्याड हल्ल्याने संपूर्ण जगभरात हळहळ व्यक्त करण्यात आली. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 300 हून जास्त निष्पाप नागरिकांचे बळी गेले होते. शहीद तुकाराम ओंबळे यांनी गिरगाव चौपाटीवर नाकाबंदी दरम्यान अजमल कसाब हा जिवंत पकडण्यात यश आले. त्यामुळे या कटाचा योग्य तपास करून अजमल कसाब याला फासावर लटकवण्यात न्याय यंत्रणेला यश आले.

या कार्यक्रमास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, आम्ही शिरूरकर फाउंडेशन चे बापू सानप, प्राध्यापक सतीश धुमाळ ज्येष्ठ पत्रकार, , पुणे जिल्हा मनसे उपाध्यक्ष मेहबूब सय्यद, माजी नगराध्यक्ष राजेंद्र शिरसागर, माजी उपनगराध्यक्ष जाकीर खान पठाण शिरूर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, श्रीराम सेनेचे शहराध्यक्ष सुनील जाधव, मनसे तालुका संघटक अविनाश घोगरे, शहराध्यक्ष आदित्य मैड, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर अध्यक्ष एजाज बागवान, काँग्रेस अल्पसंख्यांक आघाडीचे तालुकाध्यक्ष अजीम सय्यद,प्रकाश बाफना, डॉ. संतोष पोटे, माजी नगरसेवक मायाताई गायकवाड ,ज्येष्ठ पत्रकार नितीन बारावकर, पत्रकार अभिजीत आंबेकर, पत्रकार मुकुंद ढोबळे, पत्रकार फैजल पठाण, पत्रकार फिरोज शिकलकर आदी मान्यवर उपस्थित होते.रवी लेंडे यांनी सूत्रसंचालन केले व प्राध्यापक संतोष धुमाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button