प्रतिनिधी : जिजाबाई थिटे
ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये प्रचंड गुणवत्ता असून त्यांच्यामध्ये नवनवीन आधुनिक कौशल्य विकसित करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा क्रीडा परिषद,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे व चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय शिरूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना जिल्हा क्रीडाधिकारी महादेव कसगावडे यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.सी.मोहिते होते.कार्यक्रमाला,शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम,चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाच्या नियमक मंडळाचे सदस्य धरमचंदजी फुलफगर,तालुका क्रीडा अधिकारी शिवाजी कोळी, शिरूर तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष शरद दुर्गे,मा.अध्यक्ष दादासाहेब उदमले,कनिष्ठ महाविद्यालय पर्यवेक्षक प्रा.मांडलीक,महाविद्यालयाच्या जिमखाना विभागाचे प्रमुख डॉ. पी. एस. वीरकर, वरिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडाशिक्षक प्रा.डॉ.आप्पा चव्हाण,प्रा.योगेश आव्हाड, उपस्थित होते. *विजयी विद्यालयाचे संघ* *१४ वर्षे मुले*श्री श्री रविशंकर विद्या मंदिर मुळशी सेंट सेबेस्टियन हायस्कूल दौंड *१४वर्षे मुली* आर्यन वर्ड स्कूल हवेली संस्कृती स्कूल मुळशी *१७ वर्षे मुले*व्ही पी न्यू इंग्लिश स्कूल बारामती,श्री वर्धमान ज्युनिअर कॉलेज इंदापूर *१७वर्षे मुली* श्री श्री रविशंकर विद्या मंदिर मुळशी, व्ही. पी.न्यू इंग्लिश स्कूल बारामती *१९ वर्षे मुले* व्ही पी ए सी एस विद्यानगरी बारामती डी वाय पाटील जुनिअर कॉलेज मावळ *१९ वर्ष मुली*श्री सिद्धेश्वर ज्युनिअर कॉलेज बारामती श्री शिवछत्रपती जुनिअर कॉलेज जुन्नरपुणे जिल्ह्यातून सुमारे ६८ संघांनी या जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला.सर्व विजयी संघांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.सी.मोहिते यांनी केला सर्व विजयी संघांना वाडिया पार्क अहमदनगर येथे होणाऱ्या विभागीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.