निर्वि प्रतिनिधी: शकील मानियार
आज संपूर्ण जग आधुनिक होत असताना गाव खेड्याच्या शाळा सुद्धा या स्पर्धेत मागे राहता कामा नये, म्हणून या शाळांमध्ये अत्याधुनिक साहित्य असणे गरजेचे आहे. त्यामध्ये संगणक, प्रोजेक्टर या उपकरणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शाश्वत ज्ञान देण्याची तरतूद करता येऊ शकते. त्यासाठी मुलांना वर्गात काही प्रत्यक्ष अनुभव देणे गरजेचे असतात. आज संगणकाच्या युगात नवनवीन संकल्पना स्पष्ट करत असताना त्या सहज मुलांना समजावेत या उद्देशाने बेंटली कंपनीकडून श्री तात्यासाहेब खंडेराव सोनवणे विद्यालयात दोन संगणक,दोन प्रिंटर्स तसेच प्रोजेक्टर असे तब्बल दोन लाखाचे शालेय शिक्षण साहित्य आज विद्यालयास CSR फंडातून देण्यात आले. येणाऱ्या काळात या साहित्याचा उपयोग विद्यालयातील विद्यार्थ्यांना होणार असून या साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सहज शिक्षण देता येणार आहे. या साहित्यासाठी ग्रामपंचायत सदस्य अनिल कांबळे यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच बेंटली कंपनीचे मिलिंद गायकवाड यांनी मोलाचे सहकार्य केले. याप्रसंगी माजी उपसरपंच निलेश पांडुरंग सोनवणे, माजी सरपंच तात्यासाहेब सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य अनिल कांबळे, ग्रामसेवक सुरेश साळवे, सामाजिक कार्यकर्ते शफिक पठाण, विद्यालयाचे प्राचार्य विष्णू करपे सर, क्लर्क नितीन मिसाळ इत्यादी उपस्थित होते.