जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर


ओतूर ता:- जुन्नर : येथे नात्यातील तरूणीला भेटायला आलेल्या परप्रांतीय तरूणाचे अपहरण करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करणारे तीन आरोपींना ओतूर पोलीसांनी अटक केली. असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी दिली. सदर आरोपीची मा.न्यायालयाने येरवडा कारागृहात रवानगी केली आहे.
समीर पवन सोनवणे रा.ओझर नं.१,ता:- जुन्नर, जि. पुणे,दिपक यशवंत वाघ रा. ओतूर, ता:- जुन्नर, जि. पुणे,अर्जुन शंकर कांबळे रा.वांबोरी, ता:- राहुरी, जि. अहमदनगर असे अटक आरोपींची नावे आहेत.याबाबत ओतूर पोलीसात शिवम छोटेलाल मिश्रा वय ३०,रा.सतीमंदिर,गिरधारीपुरा, ता:-भारताना, जि.इटावा, राज्य उत्तरप्रदेश,सध्या रा.भोसरी, ता:- हवेली, जि. पुणे यांनी फिर्याद दिली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की,शिवम मिश्रा हा त्याचा मित्र समीर सोनवणे यांचे नात्यातील तरूणीला ओतूर येथील बसस्थानकावर बुधवारी ता:- ११ रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास भेटण्यासाठी आला असता दिपक वाघ व अर्जुन कांबळे यांनी शिवम मिश्रा याला जबरदस्तीने समिर सोनवणे याचेकडील दुचाकीवर बसवले.यावेळी दिपक वाघ म्हणाला ‘तुम्ही याला घेवुन पुढे जा मी आलोच’ असे म्हणाल्यावर समीर सोनवणे याने शिवम मिश्राला म्हणाला ‘तेरे को तो पता है हाफ मर्डरसे जादा फुल मर्डर परवडता है,आज तेरा मर्डर करता हूं’ असे म्हणून दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या अजुर्न कांबळे यास सोनवणे म्हणाला, ‘इसको आज जंगलमे ले जाकर मार डालते है’ असे म्हणुन शिवम मिश्राला जबरदस्तीने बसस्थानकावरून दुचाकीवर बसवून नगर-कल्याण महामार्गाने कल्याण बाजुकडे घेवून चालले.
यावेळी शिवम मिश्रा याने त्यांचेपासुन सुटण्याचा प्रयत्न केला असता, पाठीमागे बसलेल्या कांबळे ने शिवम मिश्रा याचे दोन्ही हात पकडुन खांद्यावर पाठीमागील बाजुस जोराचा चावा घेतला. त्यामुळे आज आपला शुभम मिश्रा नक्की न होणार अशी भिती वाटल्याने शिवम मिश्रा याने माळशेज हॉटेल राज लॉन्सचे समोर पुर्ण ताकतीने डावीकडे वाकुन दुचाकीवरून उडी मारली.पडल्यामुळे मिश्रा याचे दोन्ही हाताचे कोपरेवर व डावे बाजूस छातीवर आणि बरगडीवर खरचटून तो जखमी झाला. त्यामुळे सोनवणे व कांबळे दुचाकीसह त्याला तेथेच सोडून पळून गेला. त्यानंतर शिवम मिश्रा यांनी ओतूर पोलीस सदर घटनेबाबत फिर्याद दिली.
त्यानुसार पोलीसांनी आरोपीतांचा तांत्रिक दृष्ट्या शोध घेवून समीर सोनवणे, दिपक वाघ, अर्जुन कांबळे यांना अटक करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जुन्नर येथे हजर केले असता, मा. न्यायालयात सदर आरोपीना न्यायालयीन कोठडी सुनावली असून सदर आरोपीची मध्यवर्ती कारागृह येरवडा येथे रवानगी केली आहे.सदर गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक एस. व्ही. कांडगे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ए. ए. पाटील हे करत आहेत.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button