प्रतिनिधी: सचिन थोरवे
दिनांक 11/10/2023 रोजी दुपारी 02 वाजता नारायणगाव बस स्टँड येथून संतोष पोपट बुळे रा. कोपर मांडवे तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांचा नारायणगाव बस स्टॅन्ड येथून मोबाईल चोरी झाल्याबद्दल नारायणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास हाती घेऊन नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सनील धनवे, पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील, पोलीस हवालदार रमेश काटे, पोलीस शिपाई संतोष साळुंखे, पोलीस शिपाई केळकर, होमगार्ड सातपुते यांनी तात्काळ गुन्ह्याच्या घटनास्थळाला भेट देऊन बस स्टॅन्ड येथील सीसीटीव्ही फुटेज चेक करून सदर गुन्ह्यातील दोन संशयित इसम नामे १. विकास मालसिंग जाधव, रा. चचेरिया ता. सेंधवा जि. बिडवणी २. अर्जुन नामदेव आढाव रा . अवसरी खुर्द तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदर आरोपी यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून आरोपी यांच्याकडून चोरलेला मोबाईल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पो.हवा.रमेश काठे हे करत आहेत.
सदरची कामगीरी ही मा.अंकित गोयल सो, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, मा. मितेश घट्टे सो अप्पर पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण, मा.रविंद्र चौधर सो, उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर विभाग व मा.अविनाश शिळीमकर सो स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक महादेव शेलार,पोलीस उपनिरीक्षक सनील धनवे, पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील, पोलीस उपनिरीक्षक विनोद धुर्वे, पोलीस हवालदार रमेश काटे, पोलीस शिपाई संतोष साळुंखे, पोलीस शिपाई केळकर, पोलीस शिपाई शैलेश वाघमारे, पोलीस शिपाई दत्ता ढेंबरे, पोलीस शिपाई गोरक्ष हासे, होमगार्ड सातपुते यांनी केली आहे.