प्रतिनिधी : सचिन थोरवे


जुन्नर तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या नारायणगाव या ठिकाणी देशी बनावटीचा पिस्तूल दाखवून धाक निर्माण करणाऱ्या व्यक्तीला नारायणगाव पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेने सयुक्तरित्या कारवाई करून जेर बंद केले आहे.

पवन दत्तात्रय शेजवळ वय 37 वर्ष राहणार शिव विहार सोसायटी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे असे अटक केलेले व्यक्तीचे नाव असून सदर व्यक्ती नारायणगाव जुन्नर रस्त्यावर
हॉटेल गॅलेक्सी या ठिकाणी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एक व्यक्ती गावठी बनावटीचे पिस्तूल दाखवून धाक निर्माण करत असल्याचे माहिती गुप्तचर यंत्रणेद्वारे मिळाल्याने
नारायणगाव पोलीस स्टेशनचे एक कर्तव्यदक्ष प्रभारी पोलीस अधिकारी महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील धनवे पोलीस कॉन्स्टेबल सचिन सातपुते पोलीस नाईक मंगेश लोखंडे पोलीस कॉन्स्टेबल हासे त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पुणे पोलीस ग्रामीणचे दीपक साबळे पोलीस कॉन्स्टेबल संदीप वारे अक्षय नवले या सर्वांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली असता पवन शेजवळ हा गावठी पिस्तूल दाखवून त्या परिसरामध्ये दहशत निर्माण करत असल्याचे निदर्शनास आले त्यावेळी त्याला पोलीस पथकाने ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला नारायणगाव मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले असता कुणीही शांततेचा भंग करू नये अथवा कायदा हातात घेऊ नये कोणी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास सदर व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात येईल असे प्रभारी पोलीस निरीक्षक शेलार साहेब यांनी सांगितले पुढील तपास पोलीस हवालदार रमेश काटे करत आहे
.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button