जुन्नर प्रतिनिधी:- रविंद्र भोर
जुन्नर दि. १८ :- जुन्नर तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या असून मंगळवार अखेर दि:- १७ सरपंचपदासाठी ८ गावांतील १२ अर्ज दाखल झाले आहे. या आठ गावांमध्ये पारुंडे (४),रानमळा(२)तसेच पिंपळवंडी,पाडळी,गुळंचवाडी, बेल्हे,उंब्रज नं-१,कांदळी येथून प्रत्येकी एक अर्ज दाखल झाला आहे. तर सदस्य पदाच्या उमेदवारीसाठी ४ गावांतून १७ अर्ज दाखल झाले. यापैकी सर्वाधिक १० अर्ज पारुंडे गावातून दाखल झाले असून पिंपळवंडी(३),रानमळा(३) व खामगाव (१) येथूनही अर्ज दाखल झाले आहेत.नामनिर्देशना- सोबत सादर करण्यात येणारे घोषणापत्र संगणक प्रणालीद्वारे भरले जात आहे; मात्र त्याची प्रिंट काढताना तांत्रिक -अडचणी येत असल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने नामनिर्देशनाची मुदत सायंकाळी ५.३० पर्यंत वाढवली आहे,अशी माहिती तहसीलदार रविंद्र सबनीस यांनी दिली.