भाग 9 वा शब्दांकन =काशिनाथ आल्हाट*=============== *प्राचार्य डॉक्टर पांडुरंग गायकवाड यांना देव भेटला*
शिरूर प्रतिनिधी : शकील मनियार
वैकुंठवासी निवृत्ती महाराज गायकवाड यांचे मोठे चिरंजीव पांडुरंग गायकवाड . यांचे शिक्षण जिल्हा परिषद शाळा अवसरी बु||, म्हाळुंगे पडवळ, गावडेवाडी , कोरेगाव खुप ||, दोंदे येथे झाले. “निवृत्ती महाराज गायकवाड यांचा परिवार म्हणजे विंचवचे बि-हाड ” ‘तीन मुले ,चार मुली असा मोठा परिवार होता.’ निवृत्ती महाराज निवृत्ती महाराज हे वारी ,दिंडी, हरिनाम सप्ताह या निमित्ताने त्यांना घराबाहेर पडावे लागे.
त्यावेळी कुटुंबातला मोठा मुलगा पांडुरंग यावर कुटुंबाची जास्त जबाबदारी पडत होती. निवृत्ती महाराज यांनी आपल्या मुलांचे नाव पांडुरंग ठेवले. पांडुरंगाचे सतत नामस्मरण व्हावे. हा या मागचा उद्देश असावा. हा मोठा मुलगा पांडुरंगाचे सतत स्मरण करत राहील. याशिवाय बापाची संत संप्रदायाची मिरजदारी ही पुढे निश्चित चालवत राहील .हा उद्देश असावा. ‘तो ही वारकरी होईल’!. गायकवाड महाराज उदरनिर्वाहाच्या वास्तव बदलत होते. परंतु जास्त दीर्घकाळ हा त्यांचा खेड तालुक्यातील कोरेगाव या ठिकाणी गेला. त्यांचे वास्तव्य बदलत गेल्याने , मुलांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होत होता. कुटुंबामध्ये कमालीचे दारिद्र्य होते. कुटुंबात निवृत्ती महाराज हे एकटेच कमावते होते. बाकी खाणाऱ्यांची संख्या आणि शिक्षण घेण्याची संख्या जास्त होती.पण निवृत्ती महाराजची पत्नी सुभद्राबाई डगमगत नसे.धाडसी बाई होती. आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याची तयारी होती. तिला चूल आणि मूल याशिवाय तिसरी गोष्ट त्यांना काही माहीत नव्हती. मुले मोठी झाल्यानंतर नंतरच्या काळात त्या त्याही परमार्थात रहमान झाल्या होत्या. मुलांना मोठे करायचे. मुलांना शिक्षण द्यायचे. मुलांवर संस्कार करायचे याचसाठी आपला जन्म आहे .असं समजून त्या रात्रंदिवस खपत.
पांडुरंग गायकवाड हे इयत्ता नववी पर्यंत शिकले .परंतु पुढे शिक्षणाची असणारी गोडी कमी झाली. नववी या वर्गात नापास झाले. नंतर शाळेत पैसे भरण्यासाठी नव्हते. म्हणून त्यांनी शाळेत जाण्याचा विचार सोडून दिला. याच कालखंडात नात्यातील एक व्यक्ती सुदाम केशव राजगुरू राहणार अवसरी खुर्द हे जन्मतः माळकरी होते. ते आरोग्य सेवेत देवी डॉक्टर ते सॅनिटरी इन्स्पेक्टर या पदापर्यंत कार्यरत होते. घरात वारकरी वारसा होता. त्यामुळे ह. भ .प .निवृत्ती महाराज गायकवाड यांच्याशी ते सतत संपर्कात होते. 14 वर्षे त्यांनी आरोग्य खात्याकडून पंढरपूरची वारीची ड्युटी लावून घेतली होती .त्या वारीत ते सतत वारकऱ्यांना पाणीपुरवठा, दवाखाना सुविधा, वारकऱ्यांना दवा, गोळ्या देणे .अशी सेवा करण्यात ते धन्यता मानत होते.
निवृत्ती महाराज गायकवाड यांच्यावरती प्रचंड विश्वास आणि प्रेम करणारा हा एक वारकरी होता. नोकरीच्या शेवटीचे 14 पावत्यांचे त्यांना सरकारी बिल मिळाले होते .त्या बिलाची सर्व रक्कम त्यांनी आळंदीच्या धर्मशाळेसाठी बाबांच्या स्वाधीन केली. आणि त्यांच्या चरणावरती नतमस्तक झाले. त्या कालखंडात त्यांनी आळंदी धर्म शाळेत पहिल्यांदा निवृत्ती महाराज यांचा फोटो लावला होता. सुदाम राजगुरू यांची आणि पांडुरंग गायकवाड यांची एकदा भेट झाली. सुदाम राजगुरू यांनी पांडुरंगची चौकशी केली. चौकशी अंति समजले की, पांडुरंग शाळेत जात नाही.शाळेत फी भरण्यासाठी पैसे नाहीत.पुस्तके घेण्यासाठी पैसे नाहीत. असे पांडुरंगाने सांगितले.
“खरं तर ,!सुदाम राजगुरू यांना शिक्षणाचे महत्त्व समजले होते.तसेच निवृत्ती महाराज गायकवाड यांच्याविषयी असीम भक्ती होती. आणि त्यांचा मुलगा शाळेत जात नाही. म्हटल्यावर फी भरण्यासाठी पैसे नाहीत .त्यामुळे तो शाळेत जात नाही . असे दोघांचे संभाषण झाल्यानंतर सुदाम राजगुरू यांनी तात्काळ त्या पांडुरंगाला वाफगाव या खेड या ठिकाणी घेवून आले. तेथील वस्तीगृहात त्याचा प्रवेश घेतला .शाळेची फी भरली .पुस्तके घेवून दिली. त्याला शाळेत पाठवले. त्या दिवसापासून पुन्हा पांडुरंग गायकवाड यांचा थांबलेला शिक्षणाचा प्रवास पुन्हा सुरू झाला.तो शेवट तो प्राचार्य पदापर्यंत पोहोचला. या कामी खऱ्या अर्थाने पांडुरंग गायकवाड यांना सुदाम राजगुरू यांच्या रूपाने देव भेटला होता. देव भेटल्याची जाणीव पांडुरंग गायकवाड यांना झाली .
ज्यावेळी पांडुरंग गायकवाड हे प्राचार्य पदावरती गेले .प्राचार्याच्या खुर्चीवरती अराजमान झाले. त्यावेळी त्यांनी मागोवा घेतला .मागे वळून पाहिले . त्यावेळी माता पित्याप्रमाणे सुदाम राजगुरू यांची आठवण त्यांना झाली. ज्याप्रमाणे संत जनाबाई , संत सज्जन कसाई, संत चोखोबांना संत सावता यांना परमेश्वराने त्यांच्या कार्यात मदत केली. त्याप्रमाणे निवृत्ती महाराज हे दिंडी, वारी , हरिनाम सप्ताहात गुंतले होते .तरीही त्यांच्या मदतीला सुदाम राजगुरू यांच्या रूपाने परमेश्वर धावला होता. प्राचार्य डॉक्टर पांडुरंग गायकवाड यांच्या गरीबीच्या परिस्थितीत ज्यांनी ज्यांनी मदत केली.त्या सर्वांच्या आठवणी प्राचार्य पांडुरंग गायकवाड यांच्या स्मरणात आहेत .
आजही आवर्जून प्राचार्य डॉक्टर पांडुरंग गायकवाड जेंव्हा जेंव्हा शिक्षणाचा विषय येतो. त्यावेळी कै.सुदाम राजगुरूंच्या दातृत्वामुळे आणि मार्गदर्शनामुळे मी पुढे शिकू शकलो. माझे व्यक्तिमत्व घडवण्यासाठी जेवढे श्रेय माझ्या आई वडिलांना जाते. तेवढेच श्रेय आजही कै.सुदाम राजगुरूंना जाते. कै.सुदाम राजगुरू यांनी मायेने जवळ बोलवले. मायेने डोक्यावरून हात फिरवला. आधार दिला. जवळ घेवून काही महत्त्वाचे चार शब्द सांगितले .ते आजही प्रचार्य डॉक्टर पांडुरंग गायकवाड यांनी कानात साठवूण ठेवले आहेत.